UPSC 2022 Final Result Marks esakal
एज्युकेशन जॉब्स

UPSC परीक्षेच्या अंतिम निकालाचे गुण जाहीर; टॉपर श्रुतीला मिळाले 'इतके' Marks

सकाळ डिजिटल टीम

केंद्रीय लोकसेवा आयोगानं आता परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचे गुणही जाहीर केले आहेत.

UPSC 2022 Final Result Marks : केंद्रीय लोकसेवा आयोगानं नागरी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर केलाय. आता परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचे गुणही (Marks) आयोगानं जाहीर केले आहेत. या परीक्षेला बसलेले विद्यार्थी आता UPSC च्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जाऊन निकालासह गुण तपासू शकतात. उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बिजनौरमधील रहिवासी असलेल्या श्रुती शर्मानं (Shruti Sharma) यंदा यूपीएससी परीक्षेत अव्वल स्थान पटकावलंय. श्रुती शर्माचा रोल नंबर 0803237 असून तिला एकूण 1105 गुण मिळाले आहेत.

UPSC नागरी सेवा प्राथमिक परीक्षा 27 जून 2021 रोजी घेण्यात आली, ज्याचा निकाल 29 ऑक्टोबर 2021 रोजी जाहीर करण्यात आला. यानंतर 7 ते 16 जानेवारी 2022 दरम्यान मुख्य परीक्षा घेण्यात आली आणि 17 मे रोजी निकाल जाहीर झाला. आता अंतिम निकाल (UPSC 2022 Final Result) आणि त्याचे गुण वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

IAS Toppers Marks

  • AIR 1- श्रुती शर्माला 2025 पैकी 1105 गुण मिळाले आहेत. तिला लेखी परीक्षेत 932 आणि मुलाखतीत 173 गुण मिळाले आहेत. (54.56 टक्के)

  • AIR 2- अंकिता अग्रवालला लेखी परीक्षेत 871 आणि मुलाखतीत 179 गुण मिळाले आहेत. तिला 2015 मधून 1050 गुण मिळाले. (51.85 टक्के)

  • AIR 3- गामिनी सिंगलानं लेखी परीक्षेत 858 गुण आणि मुलाखतीत 187 गुण मिळवले. दोन्ही गुण जोडल्यानंतर तिला 2025 पैकी 1045 म्हणजेच, 51.60 टक्के गुण मिळाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar Crime : मोठा शस्‍त्रसाठा जप्त...जम्‍मू-काश्‍मिरच्या आरोपींकडून ९ रायफली, ५८ काडतुसे जप्त

Nitin Raut Video: 'जय भीम' म्हटल्याने विलासरावांनी मंत्रिपद नाकारलं; काँग्रेस नेते नितीन राऊतांचा गौप्यस्फोट

Uddhav Thackeray : प्रियंका गांधी बाळासाहेबांवर भरभरुन बोलल्या; त्यांनी भाजपचे दात घशात घातले, उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला

IND vs AUS: 'विराट किंवा रोहितचा फॉर्म नव्हे, तर गौतम गंभीर ही टीम इंडियाची सर्वात मोठी समस्या'; वाचा कोण म्हणतंय असं

Latest Maharashtra News Updates live : फूट पाडणारे राजकारण कोण खेळत आहे हे प्रत्येकजण पाहू शकतो : आमदार सुवेंदू अधिकारी

SCROLL FOR NEXT