UPSC_CDS_Exam 
एज्युकेशन जॉब्स

CDS II Result 2020: यूपीएससीनं जाहीर केला निकाल, येथे पाहा निकाल!

सकाळ डिजिटल टीम

UPSC CDS II Result 2020: नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाने संयुक्त रक्षा सेवा (CDS II) चा निकाल जाहीर केला आहे. मुलाखतीसाठी एकूण ६७२७ उमेदवार पात्र ठरले आहेत. ज्या उमेदवारांनी ८ नोव्हेंबरला घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेला हजेरी लावली होती, असे उमेदवार upsc.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन त्यांचे निकाल पाहू शकतात. उमेदवारांना 1 जुलैपर्यंत आयएमए आणि एनएसाठी, 13 मेपर्यंत एएफएसाठी आणि 1 ऑक्टोबरपर्यंत एसएससी कोर्ससाठी मूळ प्रमाणपत्रे सादर करावे लागतील.

यूपीएससीने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत अधिसूचनेमध्ये नमूद केले आहे की, ज्या उमेदवारांचा रोल क्रमांक या यादीमध्ये आला आहे, त्यांची उमेदवारी अंतिम नाही. प्रवेशाच्या अटींनुसार, उमेदवारांना त्यांचे मूळ प्रमाणपत्र सादर करावे लागेल, जेणेकरून त्यांची जन्म तारीख, शैक्षणिक पात्रता इत्यादी बाबी निश्चित होऊ शकेल.

निकाल कसा पाहावा - 
- सर्वप्रथम उमेदवारांनी यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइट upsc.nic.in वर जावे. 
- आता मुख्यपृष्ठावर दिसणाऱ्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा. 
- त्यानंतर एक पीडीएफ उघडेल. 
- हे निकालाचे पत्रक डाउनलोड करा. 
- आणि आपल्या सोयीसाठी त्याची प्रिंट आउट घ्या.

लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व उमेदवारांना भारतीय सेनेच्या भरती पोर्टलवर जाऊन दोन आठवड्यांच्या आत स्वत:ची पुन्हा एकदा नावनोंदणी करावी लागणार आहे. तसेच जे उमेदवार या परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकले नाहीत, अशा उमेदवारांची मार्कशीट ओटीए (एसएसबी इंटरव्ह्यू)चा अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर १५ दिवसांच्या आत वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर पुढील दोन महिने म्हणजे ६० दिवस ती वेबसाइटवर राहील. 

जर उमेदवारांना कोणती शंका किंवा अडचण उद्भवली असेल, तर सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सुविधा केंद्राशी संपर्क साधू शकतात. तसेच उमेदवार स्वत: देखील सुविधा केंद्रावर येऊ शकतात. किंवा पुढे दिलेल्या क्रमांकांवर कॉल करू शकतात. 
संपर्क - 011-23385271, 011-23381125 आणि 011-23098543

- नावनोंदणी करण्यासाठी येथे ► क्लिक करा

- निकाल पाहण्यासाठी येथे ► क्लिक करा

- एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: उमरगा विधानसभा मतदार संघात कोणाचा गुलाल उधळणार?

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Ambegaon Assembly Election 2024 result live: दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार; शिष्य देवदत्त निकम पराभूत

Maharashtra Election 2024: प्रविण दरेकरांचा 'तो' दावा खरा ठरला! राज्यात महायुतीचेच सरकार येणार

SCROLL FOR NEXT