अक्षयकुमार पाटील यूपीएससी परीक्षेमध्ये उत्तीर्ण (UPSC IAS Exam) होऊन बेडकीहाळच्या शैक्षणिक इतिहासात मानाचा तुरा रोवला आहे.
बेडकिहाळ : येथील प्रगतशील शेतकऱ्याच्या (Farmers) मुलाने आयएएस उत्तीर्ण होऊन भागाचे नाव लौकीक केले आहे. अक्षयकुमार राजगौडा पाटील असे त्यांचे नाव आहे. या भागातील पहिलाच आयएएस (UPSC Result 2023) अधिकारी ठरल्याने पंचक्रोशीतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
येथील प्रगतशील शेतकरी राजगौडा पाटील व प्रणिता पाटील (कूटनवर) यांचा मुलगा अक्षयकुमार पाटील यूपीएससी परीक्षेमध्ये उत्तीर्ण (UPSC IAS Exam) होऊन बेडकीहाळच्या शैक्षणिक इतिहासात मानाचा तुरा रोवला आहे.
अक्षयकुमार यांचे प्राथमिक शिक्षण बेडकीहाळ- शमनेवाडी येथील लठ्ठे शिक्षण संस्थेच्या (एलइएस) कन्नड माध्यम कॉन्व्हेंट शाळेत पहिली ते सातवीपर्यंत शिक्षण झाले. तर ८ वी ते १२ वीचे शिक्षण रामकृष्ण विद्याशाला म्हैसूर येथे झाले. २०१६ मध्ये बीएमएस कॉलेज बंगळूर येथे मेकॅनिकल इंजिनिअरिंग शिक्षण झाले.
त्यानंतर दिल्ली येथील वाजीराव व रवी कोचिंग सेंटरमध्ये २०१६-१७ पासून पहिल्या टप्प्यात यूपीएससी कोचिंगला प्रारंभ केले होते. परीक्षेसाठी पहिल्या टप्प्यात संपूर्ण भारतातून १२ लाख हून अधिक विद्यार्थी परीक्षेत बसले होते. तर दुसरी व तिसऱ्या फेरीत अडीच हजार विद्यार्थी पात्र ठरले होते. यामध्ये अक्षय कुमार यांनी ७४६ व्या रॅंकेने यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झाले.
माझ्या या यशाचे श्रेय माझ्या आई-वडिलांना देत असून लठ्ठे शिक्षण संस्थेतील शिक्षक वर्ग तसेच बेडकिहाळ-शेमनेवाडी परिसरातील मुनी महाराजांचे मार्गदर्शन व आशीर्वाद मोलाचे ठरले. यूपीएससी ही परीक्षा म्हणजे एक खडतर प्रवास असून या प्रवासात अनेक अडचणींना सामोरे गेलो आहे. आई-वडिलांच्या आशीर्वादाने मनात जिद्द व चिकाटी बाळगून ही परीक्षा उत्तीर्ण झालो.
-अक्षयकुमार पाटील
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.