सेवा निवड आयोगानं विविध पदांसाठी अधिसूचना जारी केलीय.
UPSSSC Lekhpal Recruitment 2022 : उत्तर प्रदेश अधीनस्थ सेवा निवड आयोगानं (UPSSSC) 8085 लेखपाल भरतीच्या पदासाठी अधिसूचना जारी केलीय. एकूण 8085 रिक्त पदांपैकी 3271 पदे अनारक्षित असणार आहेत. यात SC साठी 1690, ST 152, OBC 2174 आणि EWS वर्गासाठी 798 पदे राखीव आहेत. इच्छुक उमेदवार 7 जानेवारी 2022 पासून upsssc.gov.in या वेबसाइटवरती जाऊन अर्ज करू शकतात. शुल्क आणि ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 28 जानेवारी 2022 आहे. अर्जात बदल करण्याची शेवटची तारीख 4 फेब्रुवारी 2022 आहे.
या भरतीसाठी फक्त तेच उमेदवार अर्ज करू शकतात, ज्यांनी UPSSSC ची PET (प्राथमिक पात्रता परीक्षा) दिली होती. उमेदवारांना त्यांच्या PET 2021 स्कोअरच्या आधारावर लेखपाल परीक्षेसाठी शॉर्टलिस्ट केलं जाईल. दरम्यान, उमेदवारांकडे PET 2021 चे वैध स्कोअर कार्ड असणं आवश्यक आहे.
या उमेदवारांना भरतीमध्ये महत्त्व दिलं जाईल - प्रादेशिक सैन्यात किमान दोन वर्षे सेवा केली असावी किंवा त्यांच्याकडे NCC चे B प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे.
वय श्रेणी : 18-40 वर्षे.
वेतनमान : 5200- 20200 ग्रेड वेतन - 2000
सामान्य श्रेणी – 25 रुपये
ओबीसी - 25 रुपये
SC आणि ST - रुपये
दिव्यांग - 25 रुपये
पीईटी नोंदणी क्रमांक असलेल्या उमेदवारांच्या प्रमाणीकरणासाठी दोन पर्याय प्रदान केले आहेत. वैयक्तिक तपशील आणि लॉगिन OTT द्वारे केले जाऊ शकते. लॉगिन केल्यानंतर पहिल्या भागात नाव, पत्ता, आरक्षण श्रेणी, मोबाईल क्रमांक आणि ईमेल भरावा लागेल. यासोबत गरजेच्या आधारे संपूर्ण तपशील द्यावा लागेल. सर्व श्रेणींसाठी अर्ज शुल्क २५ रुपये ठेवण्यात आले आहे. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग किंवा एसबीआय ई-चलानद्वारे फी भरली जाऊ शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.