Medical Field sakal
एज्युकेशन जॉब्स

वैद्यकीय क्षेत्रातील ‘सेवा’ भाव

एखाद्या रुग्णावर उपचार करावयाचे असल्यास त्यासाठी फक्त डॉक्टर पुरत नाही, तर संबंधित उपचाराशी निगडित सेवा देणाऱ्यांचा एक मोठा संच लागतो.

डॉ. मिलिंद नाईक

एखाद्या रुग्णावर उपचार करावयाचे असल्यास त्यासाठी फक्त डॉक्टर पुरत नाही, तर संबंधित उपचाराशी निगडित सेवा देणाऱ्यांचा एक मोठा संच लागतो. रुग्णाला कोणता रोग झाला आहे, याचे प्रत्यक्ष निदान व उपचार पद्धतीविषयीचा निर्णय जरी डॉक्टर घेत असले, तरी रोगाचे निदान व उपचार करण्यासाठी तांत्रिक मदत करणारे व उपचारास कृतिरूप देणारे अनेक जण असतात.

गरज

ॲलोपॅथी पद्धतीने चिकित्सा करताना वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या केल्या जातात, जसे क्ष-किरण तपासणी, सोनोग्राफी, रक्त-लघवी-थुंकी तपासणी आदी. या सर्व गोष्टी करण्यासाठी तंत्रज्ञ लागतात, ते या क्षेत्रातील कुशल कामगार असतात. प्रयोगशाळा तंत्रज्ञ, क्ष-किरणतंत्रज्ञ असे विशेष तज्ज्ञता देणारे छोटे छोटे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. अलीकडच्या काळात रेडिएशन, एन्डोस्कोपी सारखी नवनवीन तंत्र येत आहेत.

सर्वसाधारपणे १० वी अथवा १२वी शास्त्रशाखेनंतर या अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येतो. कमी वेळात चटकन अर्थार्जनासाठी तयार करू शकणारे हे व्यावसायिक अभ्यासक्रम अनेकांना रोजगार उपलब्ध करून देतात. आज रुग्णालयातील प्रयोगशाळांमधे अथवा इतर स्वतंत्र प्रयोगशाळांत अशा कुशल व्यक्तींची मोठी गरज आहे. कोरोनासारख्या साथीच्या आजारात यांची कशी गरज पडते, हे आपण अनुभवले आहे.

अभ्यासक्रम

डॉक्टरांनी उपचार योजना सांगितली की, पुढच्या बऱ्याच गोष्टी परिचारिका अंमलात आणतात. औषधे देणे, इंजेक्शन देणे, रक्त घेणे, सलाईन लावणे, मलमपट्टी करणे, रक्तदाब मोजणे अशा अनेक गोष्टी परिचारिका करत असतात. रुग्णांना आराम पडावा म्हणून आवश्यक सगळ्या गोष्टींची काळजी त्या घेतात.

परिचारिकांमधेही कामाच्या तज्ज्ञतेनुसार अनेक प्रकार असतात. काही रुग्णसेवा देतात, तर काही ऑपरेशन करताना डॉक्टरांना मदत करतात. यासाठी १२वी शास्त्रशाखेनंतर या विषयात पदवी मिळवता येते. १० वी नंतरचेही काही अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

फिजिओथेरपिस्ट

अपघातात झालेली स्नायूंची अथवा हाडांची दुखापत औषधांनी काही प्रमाणात जरी बरी झाली, तरी त्यानंतर अनेक दिवस बाह्य उपचार घ्यावे लागतात. कंबरदुखी, मानदुखी, खांदेदुखी असे अनेक आजार अनेक वेळा केवळ भौतिक उपचारांनी बरे होतात. यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम करवून घेणे, ताण देणे, मालिश करणे आदी गोष्टी कराव्या लागतात.

या सर्व गोष्टी करवून घेणारे तज्ज्ञ म्हणजे भौतिकोपचार तज्ज्ञ (फिजिओथेरपिस्ट). खेळाडूंना तर यांचा खूप मोठा आधार असतो. १२वी शास्त्रशाखेनंतर या विषयात पदवी मिळवता येते. त्यानंतर एखाद्या रुग्णालयात डॉक्टरांच्या हाताखाली अथवा स्वतंत्र डॉक्टर म्हणूनही व्यवसाय करता येतो.

अलीकडच्या काळात यांना मोठी मागणी आहे. शिवाय मोठमोठे खेळाडू वैयक्तिक पातळीवर यांची नेमणूक करतात. सांघिक पातळीवरही प्रत्येक खेळासाठी एकातरी भौतिकोपचार तज्ज्ञाची नियुक्ती करण्यात येते.

आहारतज्ज्ञ

अलीकडच्या काळात चुकीच्या जीवनशैलीमुळे निर्माण होणारे विकार मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. यातील एक घटक म्हणजे आहार. मधुमेह आणि रक्तदाबाच्या विकारांचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. अतिस्थूल आणि स्थूल व्यक्ती मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे आहारतज्ज्ञांची आवश्यकता ही मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.

खेळाडूंसाठी आणि व्यायामशाळेतही आहारतज्ज्ञांची मोठ्या प्रमाणावर गरज असते. १२ वी शास्त्र शाखेनंतर या विषयात पदवी मिळवता येते. त्यानंतर एखाद्या डॉक्टराच्या हाताखाली अथवा स्वतंत्रही व्यवसाय करता येतो.

संधी व आव्हाने

दिवसेंदिवस रुग्णसंख्या आणि रुग्णालये वाढतच असल्याने या क्षेत्रात डॉक्टरांच्या इतकीच ह्या पूरक सेवा देणाऱ्या तज्ज्ञांची मोठी गरज आहे. डॉक्टरकीपेक्षा ह्या सेवा थोड्या दुय्यम जरी समजल्या जात असल्या तरी, यांच्याशिवाय वैद्यकीय क्षेत्र चालूच शकत नाही. रुग्णालये बारा महिने चोवीस तास चालू ठेवावी लागत असल्याने यातील बऱ्याचशा सेवाही अखंड चालू राहतात.

त्यामुळे पाळ्यांमधे काम करावे लागते. सुट्ट्यांचे प्रमाण अल्प असते. रुग्णांच्या गरजांप्रमाणे तुमचा दिनक्रम आखावा लागतो. तुमच्याकडे सेवाभाव नसेल तर या क्षेत्रात येणे उचित नाही. या प्रकारची कामे करण्यासाठी मोठे धैर्य लागते. रुग्णांच्या शरीराशी थेट संपर्क येतो.

शरीरावरील जखमा अथवा दोष पाहून भीती वाटत असेल किंवा किळस येत असेल तर या क्षेत्रात काम करणे अवघड आहे. शिवाय तुमची स्वतःची प्रकृती - रोगप्रतिकारक शक्ती चांगली असावी लागते. नियमित आर्थिक उत्पनांचे स्रोत जरी हे व्यवसाय असले, तरी सेवाभाव नसेल तर या क्षेत्रात दीर्घकाल कार्यरत राहणे अवघड आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT