Animal Doctor Sakal
एज्युकेशन जॉब्स

प्राण्यांचे डॉक्टर व्हायचंय ?

सकाळ वृत्तसेवा

प्रा. विजय नवले : करिअरतज्ज्ञ

सध्या ‘पेट्स’चा जमाना आहे. प्राण्यांवर मनापासून प्रेम करणारी मंडळी आपल्याला आजूबाजूला दिसत आहेत. पाळीव प्राणी, मानवाला उपयुक्त प्राणी, त्याचसोबत एकूणच सर्वच प्राणी यांनादेखील आजार आहेत, दुखणी आहेत. गाय, बैल, म्हैस, शेळी, कोंबडी, कुत्रे, मांजर, घोडा यांसह सर्वच प्राण्यांवर उपचार करणारी मंडळी म्हणजे व्हेटर्नरी डॉक्टर. प्राण्यांचा डॉक्टर होणे हे उत्तम करिअर तर आहेच; परंतु त्यासोबतच हे एक चांगले सेवाकार्यदेखील आहे. त्यासाठी शिक्षण हवे बीव्हीएस्सी अँड एएच.

म्हणजेच बॅचलर इन व्हेटर्नरी सायन्स अँड ॲनिमल हजबंडरी. बीव्हीएस्सी म्हणजे प्राण्यांचा तज्ज्ञ. जनावरांचा डॉक्टर. खासकरून प्राण्यांसाठी पालन, पोषण, उपचार आणि प्रजनन क्षेत्रात आवडीने काम करू इच्छिणाऱ्यांसाठी ही पदवी शास्त्रोक्त पद्धतीने कार्य करण्यासाठी चांगली आहे.

पात्रता

हा बारावी सायन्सनंतर नियमित पूर्ण वेळ वैद्यकीय अभ्यासक्रम आहे. बारावी सायन्समध्ये पीसीबी ग्रुप आवश्यक असून, ‘नीट’च्या परीक्षेतील मेरिटनुसार प्रवेश ठरतो.

विषय

व्हेटर्नरी ॲनाटॉमी, फिजिऑलॉजी, व्हेटर्नरी बायोकेमिस्ट्री, फार्म्याकॉलॉजी अँड टॉक्सिकॉलॉजी, पॅरासायटॉलॉजी, व्हेटर्नरी मायक्रोबायोलॉजी, पॅथॉलॉजी, व्हेटर्नरी पब्लिक हेल्थ अँड एपीडेमिऑलॉजी, ॲनिमल न्यूट्रिशन, ॲनिमल जेनेटिक्स अँड ब्रीडिंग, लाइव्ह स्टॉक प्रॉडक्शन मॅनेजमेंट, लाइव्ह स्टॉक प्रॉडक्ट टेक्नॉलॉजी, व्हेटर्नरी गायनॅकॉलॉजी, व्हेटर्नरी सर्जरी, व्हेटर्नरी मेडिसीन, क्लिनिकल प्रॅक्टिसेस, लाइव्ह स्टॉक फार्म प्रॅक्टिसेस आदी विषय असतात.

कालावधी

कोर्सचा कालावधी साडेपाच वर्षांचा आहे. पहिली तीन शैक्षणिक सत्रे प्रत्येकी एक वर्ष कालावधीची असतात, तर शेवटचे सत्र दीड वर्षांचे असते. त्यानंतर एक वर्ष कालावधीची पूर्ण वेळ स्वरूपाची इंटर्नशिप करावी लागते. थेअरी लेक्चर्स सोबतच प्रॅक्टिकलही असते. लॅब प्रॅक्टिकल्स, व्हायवा, जर्नल वर्क, प्रात्यक्षिक, कार्यशाळा, सेमिनार, इंटर्नशिप, सेमिस्टर परीक्षा, थेअरी आणि प्रॅक्टिकल परीक्षा अशा स्वरूपातील आराखडा कोर्समधील अध्यापनात असतो.

इंटर्नशिप महत्त्वाची मानली जाते, ज्यामध्ये काही भाग उद्योजकता प्रशिक्षणाचादेखील असतो. प्राण्यांच्या जाती-प्रजातींची ओळख, छोट्या आजारांपासून मोठ्या आजारांचे उपचार, आजारांची लक्षणे, दातांचे आरोग्य, आहार, दुधाच्या तपासण्या, सॅम्पल कलेक्शन, रक्त तपासण्यांचे विश्लेषण, भूल आणि उपचार, सर्जरी, औषध व लसीकरणाचे नियोजन आदी बाबी इंटर्नशिपच्या काळात प्रत्यक्षपणे अध्ययन केल्या जातात.

करिअर संधी

शिक्षण पूर्ण केल्यानंतर व्हेटर्नरी डॉक्टर म्हणून करिअर सुरू करता येते. काही डॉक्टर कुत्रे, मांजर अशा पाळीव प्राण्यांवर उपचार करतात. त्यांचे स्वतंत्र क्लिनिक असते किंवा ते प्राण्यांच्या हॉस्पिटलमध्ये कार्यरत असतात. काही डॉक्टर शेतात काम करणाऱ्या गुरांसाठी, जनावरांसाठी काम करतात. प्राण्यांसंबंधित मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, पॅथॉलॉजी, औषधनिर्माण आदी क्षेत्रातसुद्धा नोकरीच्या संधी असतात. काही मंडळी प्राण्यांच्या आहार विषयातील तज्ज्ञ बनतात, तर काही प्राण्यांच्या ‘केअर टेकिंग’मध्ये रस घेतात.

पोल्ट्री, मांस, दूध ही मोठ्या मागणीची कार्यक्षेत्रे आहेत, जिथे प्राण्यांचे तज्ज्ञ डॉक्टर अपेक्षित असतात. प्राणी आणि माणसे यांना एकमेकांपासून आजार उद्भवू नयेत म्हणून संशोधन आणि प्रतिबंधात्मक काम करणारे काही डॉक्टर असतात. संशोधनामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगले यश मिळते.

उच्च शिक्षण

परदेशात जाऊन डीव्हीएम (डॉक्टर ऑफ व्हेटरिनरी मेडिसीन) हा चार वर्षांचा कोर्स करता येऊ शकतो. शासकीय रचनेच्या ताब्यात असलेले प्राणी, संरक्षण दलातील आणि पोलिस दलातील प्राणी खासकरून प्रशिक्षित कुत्री, शेती विभागाशी संबंधित प्राणी, उद्यानातील जंगली प्राणी, अभयारण्ये, वन्यजीव विषयात काम करणाऱ्या संस्थांमध्ये कामाची संधी असते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT