एज्युकेशन जॉब्स

संधी करिअरच्या... : बारावीनंतर कृषी क्षेत्र खुणावतेय

भारत हा कृषिप्रधान देश असून साठ टक्के जनता कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे.

विवेक वेलणकर

भारत हा कृषिप्रधान देश असून साठ टक्के जनता कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. कृषी व संलग्न क्षेत्रांमधील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पीक पद्धतीत होणारे बदल, मशागतीचे तंत्र, खते व बी बियाणे यांचा वापर, पाणी व्यवस्थापन, कृषी प्रक्रिया प्रकल्प, जैविक तंत्रज्ञान, उती संवर्धन, शेतीमाल व फळांची साठवणूक, वाहतूक आणि विक्री व्यवस्था, शेतीमाल/फळे/दुग्धजन्य पदार्थांची निर्यात, मत्स्य व कोळंबी संवर्धन इ. बाबींमुळे कृषी व संलग्न क्षेत्रात प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता भासत आहे. बारावीनंतर कृषी क्षेत्रात चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहे. यामध्ये बीएस्सी कृषी/उद्यानविद्या/वनविद्या, कृषी अभियांत्रिकी, फूड टेक्नॉलॉजी असे विविध अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. या अभ्यासक्रमांत प्रवेशासाठी महाराष्ट्र सीईटी ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. महाराष्ट्रात राहुरी, परभणी, अकोला व दापोली या चार कृषी विद्यापीठांतर्गत सुमारे दीडशे महाविद्यालयात पंधरा हजारांवर जागा उपलब्ध आहेत.

यातील सुमारे तीन हजार जागा शासकीय महाविद्यालयात तर बारा हजार जागा खासगी महाविद्यालयात उपलब्ध आहेत. महाराष्ट्र सीईटीचा निकाल काही दिवसांपूर्वी जाहीर झाला असून कृषी पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया जाहीर झाली आहे. यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी फिजिक्स केमिस्ट्री व मॅथेमॅटिक्स हे विषय घेऊन सीईटी परीक्षा उत्तीर्ण केली असेल त्यांना ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग आणि फूड टेक्नॉलॉजी या शाखांसाठी अर्ज करता येईल. ज्या विद्यार्थ्यांनी फिजिक्स केमिस्ट्री व बायॉलॉजी हे विषय घेऊन सीईटी परीक्षा उत्तीर्ण केली असेल त्यांना वनविद्या व फिशरी सायन्स या शाखांसाठी अर्ज करता येईल.

ज्या विद्यार्थ्यांनी फिजिक्स केमिस्ट्री व बायॉलॉजी वा फिजिक्स केमिस्ट्री व मॅथेमॅटिक्स हे विषय घेऊन सीईटी परीक्षा उत्तीर्ण केली असेल त्यांना बीएस्सी कृषी उद्यानविद्या/बायो टेक्नॉलॉजी/कम्युनिटी सायन्स या शाखांसाठी अर्ज करता येईल. अर्ज ऑनलाइन पद्धतीने १८ नोव्हेंबरपर्यंत भरता येतील, त्यानंतर आलेल्या अर्जांची २९ नोव्हेंबर रोजी अंतिम मेरीट लिस्ट जाहीर होईल. त्यानंतर १३ डिसेंबर पर्यंत जागा भरण्यासाठी तीन फेऱ्या होतील. जानेवारी पासून महाविद्यालयात अभ्यासक्रम सुरू होईल.

कृषी पदवी शिक्षणानंतर उच्च शिक्षणाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत शिवाय या क्षेत्रातील पदवीधरांना नोकरी/व्यवसाय/स्वयंरोजगार यामध्येही संधी उपलब्ध आहेत. याशिवाय बॅंका, विमा कंपन्या, केंद्र व राज्य शासनाची विविध खाती/महामंडळे यासाठी होणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी हे पदवीधर पात्र असतात. याचबरोबर बायोटेक्नॉलॉजी, टिश्यू कल्चर, प्लॅन्ट ब्रिडिंग, बायो फर्टिलायझर्स, बायो पेस्टिसाईड्स अशा विविध क्षेत्रात देशात व परदेशात संशोधन संधी उपलब्ध आहेत. याशिवाय गोपालन, कुक्कुटपालन, शेळीपालन, फळे/भाजीपाला/ शेतमालाची विक्री यासारखे स्वयंरोजगार पर्यायही उपलब्ध आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : निकालाच्या पार्श्वभूमीवर 'मविआ'च्या प्रमुख नेत्यांत 'हाॅटेल हयात'मध्ये तब्बल अडीच तास चालली बैठक

Satara Crime: कश्‍मिरासह चौघांकडून १४ कोटींची फसवणूक; आणखी एक गुन्हा दाखल

Cyber Fraud Alert : ऑनलाइन फोटो पोस्ट करताय? सावध व्हा! तुमचे फिंगरप्रिंट्स चोरी होऊ शकतात; काय आहे नवा फ्रॉड? सुरक्षेचा उपाय पाहा

Price Hike : लसण, कांदा, खाद्यतेल भडकले...लसण प्रति किलो ४००, खाद्यतेल डब्ब्यामागे २०० रुपयांनी महागले

Maharashtra Politics: ..तर राज्यात लागू होवू शकते राष्ट्रपती राजवट; सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग

SCROLL FOR NEXT