Resume and CV Esakal
एज्युकेशन जॉब्स

Resume आणि CV मध्ये काय फरक असतो? जाणून घ्या

मुलाखतीला जाताना आपल्याला रेझ्युमे (Resume) किंवा सीव्ही (CV) सादर करावा लागतो.

सकाळ डिजिटल टीम

नोकरी (Job) मिळवणं हे आजच्या काळात एक आव्हान होऊन बसलंय. काम मिळवणं किंवा नोकरी मिळवण्याच्या प्रक्रियेतील महत्त्वाचा भाग म्हणजे मुलाखत (Interview). मुलाखतीला जाताना आपल्याला रेझ्युमे (Resume) किंवा सीव्ही (CV) सादर करावा लागतो. पण अनेकांना यांतील नेमका फरक ठाऊक नसतो. आज आपण रिझ्युमे आणि सीव्ही यांतील फरक समजावून घेणार आहोत.

Resume and CV: सीव्ही (Curriculum Vitae- CV) आणि रेझ्युमे (Resume) हे अत्यंत महत्त्वाचे असतात. नोकरी मिळविम्यासाठी रेझ्युमे किंवा सीव्हीची आपल्याला गरज लागते. परंतु आपण जेव्हा रिंझ्युमे किंवा सीव्ही बनवत असतो, तेव्हा त्यावर अगदी सहजपणे सीव्ही किंवा रिझ्युमे असं लिहून टाकतो. परंतु यात फरक असतो, जो आपल्याला माहिती नसतो.

सीव्ही आणि रेझ्युमेचा अर्थ एकच आहे असे अनेकांना वाटते. लोक त्याला समानार्थी समजतात. त्यामुळे बऱ्याचदा गडबड होते. त्यामुळे तुम्ही जर मुलाखतीला जाणार असाल. तर आधी तुम्हाला या दोघांतील फरक समजून घेणं महत्त्वाचं आहे.

रेझ्युमे (Resume):

रेझ्युमे हा फ्रेंच भाषेतील शब्द आहे, ज्याचा अर्थ 'सारांश' असा होतो. रेझ्युमेचे स्वरूप संक्षिप्त असतं. तुमच्याबद्दलची सर्व माहिती अगदी थोडक्यात त्यामध्ये नमूद करायची अरते. एखाद्या विशिष्ट क्षेत्रातील तुमची कौशल्ये, पात्रता आणि निपुणता या गोष्टी यामध्ये लिहिलेल्या असतात.

रेझ्युमे संक्षिप्त असल्यामुळे फक्त एक किंवा दोन पानांचा असतो. रेझ्युमेमध्ये नोकरीसाठी लागणारी पात्रता आणि अनुभव लिहिलेला असतो. सोप्या भाषेत, तुमची थोडक्यातील माहिती रेझ्युमेमध्ये लिहिली जाते.

सीव्ही (Curriculum Vitae) -

तुमच्याबद्दलच्या तपशीलवार माहितीसाठी सीव्ही (Curriculum Vitae) बनवावा लागतो. सीव्हीमध्ये तुम्हाला तुमच्या माहितीचा प्रत्येक तपशील नमूद करावा लागतो. Curriculum Vitae ही संज्ञा लॅटिन शब्दापासून घेण्यात आली आहे. ज्याचा अर्थ 'कोर्स ऑफ लाइफ' असा होतो.

सीव्ही (Curriculum Vitae) मध्ये तुमची प्रत्येक माहिती तपशीलवार दिलेली असते. तुमचा अभ्यास, अनुभव, यश यावर आधारित माहिती योग्य पद्धतीने मांडली जाते. अधिकारी स्तरावरील किंवा अनुभवाच्या नोकऱ्यांसाठी सीव्ही योग्य मानला जातो. जर तुम्ही उच्च पदासाठी अर्ज करत असाल तर तुम्हाला बायोडाटा नव्हे तर सीव्ही बनवावा लागेल. ज्यामध्ये तुमची सर्व माहिती सहज मिळू शकेल. तुमच्या अनुभवानुसार सीव्ही तीन ते चार पानांचा असू शकतो.

सीव्हीमध्ये काय लिहाल?

आतापर्यंतच्या केलेल्या सर्व नोकऱ्या आणि पदांबद्दल लिहू शकतो.

तुम्ही तुमच्या जीवनातील यशाबद्दल देखील सीव्हीमध्ये लिहू शकता.

तुम्ही तुमच्या योगदानाबद्दल देखील लिहू शकता.

रेझ्युमे आणि सीव्ही या दोघांबद्दल सोप्या भाषेत सांगायचे झाले तर तुमच्या थोडक्यातील माहितीला रेझ्युमे असे म्हणतात आणि तुमच्या तपशीलात दिलेल्या माहितीला सीव्ही म्हणतात. ज्यामध्ये तुमच्याबद्दलची प्रत्येक गोष्ट कळू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohammad Shami पुनरागमनाच्या सामन्यातच ठरला मॅचविनर! ७ विकेट्सह फलंदाजीतही पाडली छाप; पाहा Video

Winter Health Tips : हवामानातील बदलामुळे होणाऱ्या सर्दी-खोकल्याला वैतागला आहात, औषधांपेक्षा हे घरगुती उपाय ठरतील फायद्याचे

Healthy Food : मुलांसाठी पोषक आहेत हे लाडू, घरीच बनवा अन् नैसर्गिकरित्या मुलांची उंची वाढवा

Cherry Blossom Festival : चेरी ब्लॉसम फेस्टिव्हल पहायला जपान,चीनला कशाला जायचं? भारतात आहेत ही खास ठिकाणं

Latest Maharashtra News Updates live : नागपूरमध्ये शहा, खर्गे एकाच हॉटेलमध्ये मुक्कामी

SCROLL FOR NEXT