NEET UG  google
एज्युकेशन जॉब्स

NEET UG परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थी का करत आहेत ? पाहा...

एकाच वेळी अनेक परीक्षांची तयारी करणे विद्यार्थ्यांना कठीण जाणार आहे.

नमिता धुरी

मुंबई : NEET UG 2022चे आयोजन १७ जुलैला प्रत्यक्ष करण्यात आले आहे. मात्र ही परीक्षा रद्द करण्याची मागणी विद्यार्थी करत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की मोठ्या संख्येने विद्यार्थी नीट आणि जेईई परीक्षा देत असतात. यंदा दोन्ही परीक्षांमध्ये खूपच कमी अंतर आहे. तसेच CUET परीक्षासुद्धा जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात होणार आहे. त्यामुळे एकाच वेळी अनेक परीक्षांची तयारी करणे विद्यार्थ्यांना कठीण जाणार आहे.

नीट परीक्षेचे उमेदवार गेल्या काही दिवसांपासून शिक्षणमंत्री आणि NTAला ट्विटरवर टॅग करून आपली व्यथा मांडत आहेत. दिवस-रात्र ट्विट करूनही विद्यार्थ्यांच्या बाजूने काहीच निर्णय झालेला नाही. विद्यार्थ्यांची मागणी आहे की किमान ४ ते ६ आठवड्यांसाठी परीक्षा स्थगित करावी, जेणेकरून त्यांना पुरेसा अभ्यास करता येईल.

शाहीद नावाच्या एका विद्यार्थ्याने लिहिले आहे की, जेईई परीक्षा जुलैपर्यंत स्थगित करावी. प्रथमच ही परीक्षा नीटच्या आधी होते आहे. गेल्या वर्षी जेईई परीक्षा ४ वेळा देता आली आणि यावर्षी ती स्थगित करण्यात आली. NTA पक्षपाती निर्णय का घेत आहे. विद्यार्थ्यांना योग्य न्याय द्यावा.

आणखी एका विद्यार्थ्याने लिहिले आहे की, कृपया नीट परीक्षा पुढे ढकलावी. दरवर्षी आम्हाला एकच संधी मिळते आणि आम्हाला तिचा पुरेपूर उपयोग करायचा आहे. बोर्ड परीक्षा आणि नीट मध्ये काहीही फरक नाही. नीटसारख्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास एका महिन्यात कसा होऊ शकतो. कृपया ही परीक्षा ऑगस्टमध्ये आयोजित करावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपाचे अतुल भातखळकर आघाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT