Women’s Jobs 
एज्युकेशन जॉब्स

Women’s Jobs : कुकींग,फॅशन डिझाईनींग आता बास झालं! मैत्रिणींनो,भरमसाठ पॅकेज असलेल्या या क्षेत्रांना द्या प्राधान्य

Highest paying jobs for women : नोकरी करणारे व्यक्ती कितीही शिकली ती हुशार असली तरी शेवटी सर्व गोष्टी पॅकेज किती आहे, यावर येऊन थांबतात.

सकाळ डिजिटल टीम

Women’s Jobs Opportunities :

आपल्या देशात अशी अनेक कामे आहेत जिथे स्री-पुरूष समानता मानली जाते. कारण, महिला पुरूषांपेक्षा कमी नाहीत. त्याही तितक्याच मेहनतीचे आणि काम करतात. पण काही क्षेत्र अशी आहेत जिथे महिलांना भरमसाठ पगाराचे पॅकेज मिळू शकते.

नोकरी करणारे व्यक्ती कितीही शिकली ती हुशार असली तरी शेवटी सर्व गोष्टी पॅकेज किती आहे, यावर येऊन थांबतात. कारण सध्या स्मार्ट वर्कचा जमाना आहे. यामुळे तुम्ही कमी वेळात किती चांगलं काम करू शकतात यावर तुमचं पॅकेज ठरलेलं असतं.

महिलांच्या बाबतीत नेहमी घरात बसून काय करायचं म्हणून किरकोळ काम करण्याचा सल्ला दिला जातो. त्यांनी कुकींग क्लासेस करावे, मुलांची शिकवणी घ्यावी किंवा शिवणकाम करावं, असं सांगितलं जातं. त्यातून त्यांना फारसा नफा मिळत नाही. काही मुली सध्या करिअर निवडताना इंजिनियर किंवा डॉक्टर हे क्षेत्र निवडतात. कारण त्यांना लग्नानंतर सुद्धा काम करण्याची इच्छा असते.

आत्ता सध्या फायदेशीर असलेल्या काही क्षेत्रात तुम्ही जर पाऊल टाकले. तर अल्पावधीतच तुमचं मानधन अपेक्षेहून अधिक वाढेल. ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

डेटा सायंटिस्ट

अलीकडच्या काळात आपल्या देशात डेटा सायंटिस्टची मागणी झपाट्याने वाढली आहे. त्यामुळे यामध्ये महिलांचाही सहभाग दिसून येत आहे. 12वी उत्तीर्ण झाल्यावरच तुम्ही या क्षेत्रात सुरुवात करू शकता. बारावीनंतर या क्षेत्रात करिअर करण्यासाठी विविध पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. ग्रॅज्युएशननंतर तुम्ही या क्षेत्रात पीजी कोर्सेस वगैरेही करू शकता.

आर्टिफिशियल इंटेलिजेंस

आर्टिफिशियल इंटेलिजेंसचे क्षेत्रही जास्त पॅकेजच्या नोकऱ्यांमध्ये येते. या क्षेत्रातील उमेदवारांना लाखात पगार मिळतो. या क्षेत्रात करिअर करण्यासाठी तुम्ही काही प्रमुख अभ्यासक्रम म्हणजे बॅचलर इन AI, बॅचलर इन कॉम्प्युटर सायन्स आणि AI, B.Tech in Artificial Intelligence सोबत तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा देखील मिळवू शकता.  

डिजिटल मार्केटींग

परफॉर्मन्स मार्केटिंगला डिजिटल मार्केटिंग म्हणतात. कंपनीच्या जाहिरातींचा प्रभाव वाढवून तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे हा त्याचा उद्देश आहे. यासोबतच जाहिरातींचे सर्व कामकाज पाहणे हेही त्यांचे काम आहे. या क्षेत्रात महिला अन् पुरूष दोघांनाही लाखोंच्या घरात पगार दिला जातो.

सॉफ्टवेअर आर्किटेक्ट  

संगणक, लॅपटॉप यांसारखी उपकरणे आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनली आहेत. Glassdoor च्या अहवालानुसार, सॉफ्टवेअर आर्किटेक्टचा पगार वर्षाला 32 लाख रुपये असू शकतो. तंत्रज्ञान सतत बदलत आहे. काही नवीन अपडेट दर काही दिवसांनी येतात.

या सर्व कारणांमुळे मार्केटमध्ये सॉफ्टवेअर आर्किटेक्टची मागणी वाढत आहे. कॉम्प्युटर सायन्स किंवा संबंधित क्षेत्रात बॅचलर आणि मास्टर्स पदवी घेतल्याने तुम्हाला या क्षेत्रात जलद आणि अधिक यश मिळू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT