Primary Teachers sakal
एज्युकेशन जॉब्स

प्राथमिक शिक्षकांचा कार्यविस्तार

आतापर्यंत आपण व्यक्तिमत्त्वाचे वेगवेगळे घटक पाहिले आणि स्वत:ला ओळखण्यासाठी काय काय करता येईल, तेही जाणून घेतले.

सकाळ वृत्तसेवा

- डॉ. मिलिंद नाईक, प्राचार्य, ज्ञानप्रबोधिनी

आतापर्यंत आपण व्यक्तिमत्त्वाचे वेगवेगळे घटक पाहिले आणि स्वत:ला ओळखण्यासाठी काय काय करता येईल, तेही जाणून घेतले. आजपासून आपण एकेका जीवनकार्यासाठी (करिअर) आपल्याकडे काय गोष्टी असायला हव्यात? म्हणजेच ज्ञान, कौशल्य, वृत्ती इत्यादी बाबी कशा प्रकारच्या असाव्या लागतात ते पाहणार आहोत. सुरुवात प्राथमिक शिक्षकापासून करूया!

सर्वसाधारणपणे पायाभूत स्तरापासून (बालवाटिका अथवा खेळगट) ते पूर्वतयारी गटापर्यंत (इ. ५ वी) म्हणजे वय वर्षे ३ पासून ते ११ वर्षापर्यंतच्या शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकाला प्राथमिक शिक्षक म्हणतात. सध्याच्या परिस्थितीत फक्त बालवाटिकेत शिकवायचे असेल, तर इयत्ता दहावीनंतरचा शिशू अध्यापिका विद्यालयातून प्रमाणपत्र वर्ग केलेला पुरतो तर अधिक वरच्या वर्गांसाठी दहावी अथवा बारावीनंतर डिप्लोमा इन एलिमेंटरी एज्युकेशन (डी.ई.एल.एड.) करावा लागतो. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीनंतर यात काही बदल होण्याची शक्यता आहे.

शिशू अध्यापक

शिशू अध्यापक म्हणून काम करताना बहुतेक वेळा विद्यार्थ्यांना पंचेंद्रियांचे शिक्षण, चांगल्या सवयी, कारक कौशल्ये, सर्वांमध्ये मिसळण्यास शिकवणे आदी गोष्टी शिकवणे अपेक्षित असून, त्यांच्या योग्य आहाराकडे लक्ष देणे गरजेचे असते.

शारीरिक क्षमतावाढीकडेही मोठ्या प्रमाणावर लक्ष द्यावे लागते, तर थोडया मोठ्या वर्गात अक्षरओळख, शब्दओळख म्हणजेच भाषा आणि संख्याज्ञान, प्राथमिक गणित, परिसर अभ्यास इत्यादी विषय शिकवायचे असतात. थोडक्यात, शिक्षकाला आहारशास्त्र, भाषा, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्रे या सर्वच विषयांची किमान माहिती असावी लागते.

शिकवण्याची कला

लहान मुलांना शिकवणे हे काही सोपे काम नाही. अगदी कोरी पाटी असलेल्या विद्यार्थ्याला आकलनासहीत शब्द आणि अंक शिकवणे अतिशय अवघड काम असते. एक उदाहरण घेऊया. विविध प्रकारच्या अनेक वस्तूंमधून खुर्ची ही वस्तू ओळखायला शिकवणे म्हणजेच खुर्ची ही संकल्पना तयार करणे. ही वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही.

कारण खुर्च्याही अनेक प्रकारच्या असतात. खुर्चीची व्याख्या करणे सहज-सोपे काम नाही. प्रयत्न करून बघा, म्हणजे लक्षात येईल. अंकांमधील तीन ही संकल्पना बघा बरं! तीन-तीनच्या संख्येच्या अनेक वस्तू दाखवून विद्यार्थ्याच्या मनात तीन ही अमूर्त संकल्पना रुजवायची असते. म्हणूनच प्राथमिक शाळेत शिक्षक होणे हे आव्हानात्मक काम आहे.

चिकाटी आणि संयम

मुले म्हणजे देवाघरची फुले; हे जरी खरे असले तरी त्यांना हाताळता येणे ही काही सोपी गोष्ट नाही. प्रचंड ऊर्जा असणाऱ्या या विद्यार्थ्यांना शिस्त ही संकल्पना माहीत नसते. आपण केलेल्या काही कृती या धोकादायक ठरू शकतात, त्यातून जीवाला धोका पोहोचू शकतो हे त्यांना समजतच नसते. सांगितलेले ऐकायचे असते, आज्ञा पाळायची असते हे त्यांना कळत नाही.

अशा परिस्थितीत शिक्षकाला अत्यंत सावध राहून प्रत्येक मुलाला घडवावे लागते आणि तेसुद्धा त्याला न घाबरवता, न दुखावता! अत्यंत चिकाटीने तेच तेच काम पुन्हा पुन्हा करत राहावे लागते, पण त्या उत्साही, ऊर्जा देणाऱ्या वातावरणात काम करणे अत्यंत आनंददायक असते. प्रत्येक वर्षी नवीन विद्यार्थी, नवी ऊर्जा असते.

वाढती मागणी

तसे बघायला गेले तर तुम्ही कुठे काम करता यावरून अतिशय त्रोटक ते अतिशय चांगले असे वेतन या क्षेत्रात मिळते. वाढत्या शाळा आणि चांगल्या शिक्षकांचा अभाव यामुळे शिक्षकांना वाढती मागणी आहे. दिवसातून ठरावीक तास काम व पुरेशा आणि निश्चित सुट्टया असल्याने काम-आयुष्य संतुलन साधणे शक्य असते.

सरकारी शाळांमध्ये पुरेसं वेतन जरी मिळत असलं, तरी अध्यापनेतर बरेच काम करावे लागते हे मात्र खरे! वेतन जरी कमी-अधिक मिळाले, तरी आपण शिकवलेले विद्यार्थी जेव्हा आयुष्यात मोठे यश संपादन करतात, तेव्हा आयुष्य सार्थकी लागल्याचे समाधान मिळते. मग होणार ना तुम्हीही शिक्षक?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT