राणी चन्नमा विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या (आरसीयु) पदव्यूत्तरच्या पहिल्या, तिसऱ्या व पाचव्या सेमीस्टरच्या लिखीत परीक्षा २८ फेब्रुवारीपासून ८ मार्चपर्यंत होणार आहेत.
बेळगाव - राणी चन्नमा विद्यापीठाअंतर्गत (Rani Channamma University) येणाऱ्या (आरसीयु) पदव्यूत्तरच्या पहिल्या, तिसऱ्या व पाचव्या सेमीस्टरच्या लिखीत परीक्षा (Semister Written Exam) २८ फेब्रुवारीपासून ८ मार्चपर्यंत होणार आहेत. यासाठी विद्यार्थ्यांकडून (Student) परीक्षांसाठी अर्ज (Exam Form) भरणा सुरु करण्यात आला असून १२ फेब्रुवारीपर्यंत दंडासहीत अर्ज भरता येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांची धावफळ सुरु झाली आहे.
विद्यापीठाने स्टुडंट पोर्टलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याच्या सुचना केल्या आहेत. त्यानुसार अर्ज भरणा केला जात आहे. परीक्षा अर्ज ३ फेब्रुवारीपासून भरला जात असून विनादंड ९ फेब्रुवारीपर्यंत भरता येणार आहे. तसेच रोज १०० रुपये दंडासहीत १० ते १२ फेब्रुवारीपर्यंत अर्ज भरता येणार आहे. अर्ज भरणा करण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले असल्याने विद्यार्थी धावफळ करत आहेत. विद्यापीठाकडून लिखित परीक्षांचे वेळापत्रक १२ फेब्रुवारीला जाहीर केले जाणार आहे. तसेच २३ फेब्रुवारीला परीक्षा प्रवेश पत्र स्टुडंट पोर्टलवरून डाऊनलोड करता येणार आहे. बेळगाव, चिक्कोडी, विजापूर व बागलकोट येथील केंद्रानी परीक्षा सामग्री, प्रश्न पत्रिका, उत्तर पत्रिका २६ ते २७ फेब्रुवारीपर्यंत विद्यापीठाकडून घ्यावी. तर प्रायोगिक परीक्षा ९ मार्च ते १६ मार्चपर्यंत होणार आहेत.
पदव्यूत्तर अभ्यासक्रमात येणाऱ्या एम. ए, एम.एस्सी, एमएसडब्य्लू, एम.एड, एमपीएड, एम. कॉम,, एमबीए, एमसीए आदींच्या परीक्षा होणार आहेत. प्रत्येकाला सेमीस्टरसाठी अर्ज शुल्क ८० रुपये आहे. मार्कस कार्ड फी १२० रुपये व प्रोजेक्ट असलेल्या विद्यार्थ्यांना ६०० रुपये व्हायवा शुल्क आकारले जाते. एम.ए, एम. कॉम, एम.एड व एमएसडब्य्लूसाठी ९६० रुपये परीक्षा फी आहे. एम.लीब, एम.पीएड, एम.एससी यांच्यासाठी १०८० रुपये, एमबीए, एमसीए यांच्यासाठी १८०० रुपये, एमएससी (सीएस) यांच्यासठी १४४० रुपये, पीजी डिप्लोमासाठी १०८० रुपये, बीए सीजे, बीएससी सीजे यांच्यासाठी ८०० रुपये, सर्टिफीकेट कोर्ससाठी ४८० रुपये परीक्षा फी आहे. तसेच रिफीटर्स विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी विषयाला वेगळी फी आकारली जाते. विद्यापीठाने एक प्रसिद्धी पत्रक काढून याची माहिती दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.