कर्नाटक विधानसभा निवडणूकीचे निकाल समोर येत आहेत. या निवडणीकीत काँग्रेस पक्षाने जोरदार मुसंडी मारली आहे. दुपारी १२.३० वाजेपर्यंत झालेल्या मतमोजणीमध्ये काँग्रेस पक्ष १२४ जागांवर आघाडी घेतली आहे. दरम्यान भाजप पराभवाकडे वाटचाल करत असतानाच भाजपचे नेते आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
कर्नाटक निवडणूकांमध्ये भाजप मागे पडल्याचे चित्र असून काँग्रेस बहुमताचा आकडा गाठण्याची शक्यता दिसून येत आहे. यादरम्यान बसवराज बोम्मई यांनी माध्यमांसमोर येत पराभव स्विकारला आहे. त्यांनी अगदी मोजक्या शब्दात निकालावर प्रतिक्रिया दिली.
बोम्मई म्हणाले की, निवडणूकीचे शेवटच्या टप्प्यातील निकाल समोर येत आहेत. खूप मेहनत घेऊन देखील आम्ही छाप पाडू शकलो नाहीत. काँग्रेसने अकडा गाठला आहे. निकाल आल्यानंतर आम्ही तपशीलवार विश्लेषण करू. एक राष्ट्रीय पक्ष म्हणून, आम्ही केवळ विश्लेषणच करणार नाही तर विविध स्तरांवर कोणत्या उणिवा राहिल्या तसेच कुठे कमी पडलो हे देखील पाहणार आहोत. आम्ही पक्षाची पुनरबांधणी करू आणि लोकसभा निवडणूक ताकदीने लढवू असे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले आहेत.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सकाळपासूनच सुरू झाली आहे. आतापर्यंत समोर आलेल्या आकड्यांनुसार, बहुमताचा आकडा पार करत काँग्रेस अनेक जागांवर आघाडीवर असल्याचं दिसत आहे. तर 224 सदस्यीय विधानसभेच्या निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसमध्ये मुख्य लढत पाहायला मिळत आहे. यादरम्यान बेळगावात मात्र मराठी माणसांचा आवाज असलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीला मोठा धक्का बसला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.