Chhattisgarh Election result: 
Election News

Chhattisgarh Election Result: छत्तीसगडमध्ये भाजपचा आश्चर्यकारक विजय; कोणता फॅक्टर ठरला महत्त्वाचा?

छत्तीसगडमधील निकाल समोर आले आहेत. राज्यात भाजपचा दणदणीत विजय झालाय. भाजप पाच वर्षाने पुन्हा सत्ता स्थापन करत आहे.

कार्तिक पुजारी

रायपूर- छत्तीसगडमधील निकाल समोर आले आहेत. राज्यात भाजपचा दणदणीत विजय झालाय. भाजप पाच वर्षाने पुन्हा सत्ता स्थापन करत आहे. तर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राज्यात पुन्हा भूपेश बघेल सरकार सत्तेत येईल अशी अपेक्षा अनेकांना होती. पण, काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला आहे. (Chhattisgarh Assembly Election result 2023 final bhupesh baghel congress lost bjp win maximum seats)

कोणत्या पक्षाला मिळाल्या किती जागा?

एकूण जागा- ९०

बहुमतासाठी आवश्यक- ४६

भाजप- ५४

काँग्रेस- ३५

गोंडवन गणतंत्र पक्ष- १

छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या एकूण ९० जागा आहेत. बहुमतासाठी ४६ जागा आवश्यक होत्या. भाजपने बहुमताचा आकडा सहजपणे पार केला आहे. एक्सिट पोलमध्ये छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे सरकार पुन्हा येईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. पण, भाजपने अनपेक्षितपणे मुसंडी मारत काँग्रेसला धक्का दिला आहे. राज्यात मोदी ब्रँड चालला असल्याचं बोललं जात आहे.

बघेल विजयी

मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचा पाटन मतदारसंघातून विजय झाला आहे. त्यांनी त्यांचा भाच्चा विजय बघेल यांचा पराभव केला. दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार दीपक बैस यांचा चित्रकोटमधून धक्कादायक रित्या पराभव झालाय. त्यांचा भाजपच्या विनायक गोयल यांनी पराभव केला. माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते रमण सिंह यांचा राजनांदगाव मतदारसंघातून विजय झाला आहे.

पराभवाचं कारण काय?

राज्यातील भाजपच्या विजयासाठी मोदींची जादू प्रभावी ठरल्याचं बोललं जातंय. भूपेश बघेल यांनी राज्यात अनेक कल्याणकारी योजना आणल्या होत्या. पण, त्याचा काही फायदा झाला नसल्याचं चित्र आहे. मोदी यांनी राज्यात ५ प्रचारसभा घेतल्या होत्या. याचा भाजपला फायदा झालाय. मोदींनी बघेल यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. शिवाय ईडीकडूनही त्यांच्यावर निवडणुकीपूर्वी गंभीर आरोप झाले होते. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT