Eknath shinde  Esakal
Election News

भाजपसाठी CM शिंदे मैदानात! विरोधी पक्षांच्या ठाम भूमिकेवर म्हणाले, 'विनंती करण्याचा अधिकार...'

पुणे पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची धडपड

सकाळ डिजिटल टीम

पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीमुळे राज्यातील राजकारण ढवळून निघत आहे. त्यामुळे आता राजकारणातील परंपरा सांगत पोटनिवडणुकीत विरोध न करता त्या बिनविरोध करण्यात याव्या असं मत खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं आहे. कसबा पोटनिवडणुकीत उमेदवार न देता ती निवडणूक बिनविरोध करावी अशी मागणही एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

तर कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रयत्न सुरू आहेत. या निवडणुकीसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, जयंत पाटील यांना फोन देखील केला. कसबा आणि चिंचवड या दोन्ही ठिकाणी उमेदवार न देण्याचं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. तरी देखील कोणताही पक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मताला सहमत नसून सर्वानी निवडणुकीला उभं राहण्याचा चंग बांधला आहे.

दरम्यान सर्व पक्षांनी आपली भूमिका ठाम असल्याचा पवित्रा घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पुन्हा यासंबधी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, आपल्या महाराष्ट्राची राजकीय परंपरा ही एखाद्या मतदार संघातील आमदार सदस्यांचे निधन झाले, तर विभागात उमेदवार न देता ती निवडणूक बिनविरोध करण्याची आपल्या राज्याची संस्कृती आहे. त्यामुळे यावेळी कसबा पोटनिवडणूक बिनविरोध करावी अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी राजकीय पक्षांना केले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार अजित पवार, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना फोन करून एकनाथ शिंदे यांनी ही पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे कसबा पोटनिवडणुकीविषयी नेत्यांना विनंतीचा फोन करणे हा आमचा अधिकार आहे. तर त्याबाबत कोणता निर्णय घ्यायचा हा अधिकार त्या त्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या मत असल्याचे एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ST Passengers : लालपरीच्या प्रवाशांत तीन वर्षांत ५० हजाराने वाढ; पुणे विभागाला आणखी १६० बसची आवश्यकता

Pakistan Army: पाकिस्तानच्या लष्करी तळावर दहशतवादी हल्ला! ७ सैनिक ठार, १५ जखमी

Women’s Asian Champions Trophy: भारतीय महिलांचे वर्चस्व कायम; चीनवर ३-० मात करत ग्रुपमध्ये अव्वल

Paranda Assembly Election : मतदानाच्या दिवशी कोणीही 'चप्पल' घालून प्रवेश केल्यास कारवाईची मागणी; अपक्ष उमेदवाराची अनोखी तक्रार

Mohammad Shami पुनरागमनाच्या सामन्यातच ठरला मॅचविनर! ७ विकेट्सह फलंदाजीतही पाडली छाप; पाहा Video

SCROLL FOR NEXT