Congress win Karnataka assembly election 2023 results using aap electoral model BJP politics  
Election News

Congress : 'आप'ची आयडीया वापरून भाजपला सत्तेतून खाली खेचलं! 'ही' होती काँग्रेसच्या विजयाची रणनिती

रोहित कणसे

कर्नाटक विधानसभा निवडणूकीच्या मतमोजणीदरम्यान मिळालेल्या ताज्या आकडेवारीनुसार राज्यात काँग्रेस सरकार येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कर्नाटकमध्ये सत्तेत असलेल्या भाजपला पराभवाचे तोंड पहावे लागले आहे. काँग्रेस १३५ पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर असल्याचं दिसून येत आहे. तर भाजप ६५, जेडीएस २० आणि इतर ०४ जागांवर आघाडीवर आहेत.

काँग्रेसच्या विजयाची कारणे काय आहेत?

कर्नाटक निवडणूकीत मिळालेल्या विजयामागे पाच कलमी योजना असल्याचे म्हटले जात आहे. काँग्रेसने कर्नाटक निवडणूकीत गोषणा केली होती की, जर त्यांचे सरकार आले थर कॅबिनेट बैठकीत पाच सुत्री योजना लागू केली जाईल. या अंतर्गत गृहज्योती , गृह लक्ष्मी, अनन्य भाग्य युवा निधी, शक्ती योजना यांचा समावेश आहे.

काँग्रेसने त्यांच्या जाहीरनाम्यात गृह ज्योती योजने अंतर्गत कर्नाटकातील सर्व घरांमध्ये २०० यूनिट फ्री वीज देण्याची घोषणा केली आहे. तसेच गृह लक्ष्मी योजनेअंतर्गत पक्ष सगळ्या कुटुंबांतील महिला प्रमुखांना २००० हजार मासिक मदत देखील देण्याचं आश्वासन दिलं होतं. तसचे अन्ना भाग्य योजनेअंतर्गत बीपीएल कुटुंबांना दरमहा १० किलो धान्य देण्यात येईल अशी घोषणा देखील काँग्रेसने केली आहे.

फ्रीबीजचा फायदा झाला...

यासोबतच बेरोजगार तरुणांना दोन वर्षांसाठी ३००० रुपये प्रतिमहिना आणि बेरोजगार डिप्लोमा धारकांना १५०० रुपये प्रतिमाह देण्याचे आश्वासन काँग्रेसने दिलं आहे। याला युवानिधी योजना असे नाव देण्यात आले आहे. तर शक्ति योजनेअंतर्गत राज्य सर्व महिलांना कर्नाटक बसेसमध्ये KSRTC आणि BMTC च्या बसेसमध्ये मोफत प्रवास करण्याची सुविधा देण्यात येईल. काँग्रेसने त्यांच्या जाहिरनाम्यात सरकारी नोकरदारांना जुनी पेंशन योजना लागू करण्याचे देखील आश्वासन दिले आहे.

हिमाचलमध्येही यश मिळालं..

काँग्रेसने फेब्रुवारी महिन्यात हिमाचल प्रदेश मध्ये देखील विजय मिळवला होता. हिमाचल प्रदेश निवडणूकात देखील काँग्रेसने OPS लागू करण्याचे आश्वासन दिले होते. ज्याला लोकांकडून मोठ्या संख्येने स्वीकारलं गेलं.

कर्नाटकमध्ये देखील काँग्रेसने आरक्षणामध्ये ५० टक्के वाढ करून ७५ टक्के करणे आणि महिलांना फ्री बस सुविधा देण्याचे आश्वासन दिले आहे. काँग्रेसने कर्नाटकच्या सरकारी विभागांमध्ये रिकामी पदे लवकरच भरण्याचे देखील आश्वासन दिले आहे. ज्यामध्ये ८० टक्के आरक्षण स्थानिक लोकांना दिले जाणार आहे.

भाजपने काँग्रेसच्या आश्वासनांची उडवली खिल्ली

भाजपने काँग्रेसने दिलेल्या आश्वसनांना फ्रीबीज म्हणत त्यांची खिल्ली उडवली होती. पण काँग्रेसने त्यांचे आश्वसने कायम ठेवली. काँग्रेसने कर्नाटकात आपने वापरलेली रणनिती वापरली. ज्यामध्ये दिल्लीमध्ये दरमहा २०० यूनिट वीज तसेच महिन्याला २०००० लीटर फ्री पाणी आणि मोहल्ला क्लिनीक स्थापन करून दुसऱ्यांदा सत्ता स्थापन केली. केजरीवाल यांच्या सरकारने महिलांना डिटीसीच्या बसने प्रवास देखील फ्री केला आहे. काँग्रेसने देखील त्याचे अनुकरण करत जाहिरनामा प्रसिद्ध केला होता. पण काँग्रेसला गुजरात आणि उत्तराखंड येथे यश मिळालं नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सचिन पाटील 13327 मतांनी आघाडीवर

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Ambegaon Assembly Election 2024 result live: दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार; शिष्य देवदत्त निकम पराभूत

Maharashtra Election 2024: प्रविण दरेकरांचा 'तो' दावा खरा ठरला! राज्यात महायुतीचेच सरकार येणार

SCROLL FOR NEXT