haryana congress cm candidate esakal
Election News

Haryana 2024 election result: हरियानाला मिळणार दलित मुख्यमंत्री? या दोन नेत्यांमध्ये स्पर्धा

Sandip Kapde

हरियाना विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्याआधीच काँग्रेस पक्षात मुख्यमंत्री कोण होणार, यावरून तणाव वाढत चालला आहे. 5 ऑक्टोबर रोजी झालेल्या मतदानानंतर अनेक एक्झिट पोल काँग्रेसच्या बाजूने आले. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरील माहितीनुसार कल देखील काँग्रेसच्या बाजूने आहेत. त्यामुळे काँग्रेस नेते आनंदात आहेत आणि त्यांना सत्ता परत मिळेल, अशी आशा आहे. परंतु सत्ता मिळाल्यास मुख्यमंत्रीपदावर कोण बसणार यावरून पक्षात अंतर्गत संघर्षाची शक्यता निर्माण झाली आहे.

दलित नेत्याला संधी मिळणार का?

हरियाना राज्याची स्थापना 1966 मध्ये झाल्यापासून आजवर कोणताही दलित नेता मुख्यमंत्री बनू शकलेला नाही. हरियानामध्ये बहुतेकवेळा जाट नेत्यांनीच मुख्यमंत्रीपद भूषविले आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीत काँग्रेसला जिंकण्याची संधी मिळाल्यास, कुमारी सैलजा यांच्यासारख्या दलित नेत्याला मुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय घेणार का, हा प्रश्न उपस्थित होतो.

कुमारी सैलजा हरियानातील सिरसा येथून खासदार आहे. त्यांनी प्रचारादरम्यान दलित नेत्याला मुख्यमंत्री करण्याची मागणी उचलून धरली होती. त्यांनी सार्वजनिकरित्या आपली इच्छा व्यक्त केली आहे की, त्यांना मुख्यमंत्री बनवले जावे. पण काँग्रेसमधील काही नेते जसे की भूपेंद्र सिंह हुड्डा आणि रणदीप सुरजेवाला हे देखील मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक आहेत.

दलित नेत्यांना किती संधी?

हरियानात जाट समाजाच्या 25% आणि दलित समुदायाच्या 21% लोकसंख्या आहे. त्यामुळे काँग्रेससाठी जातीय समीकरण महत्त्वाचे ठरते. दलित नेत्याला मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतल्यास, काँग्रेसला मोठ्या प्रमाणावर दलित मतदारांचा पाठिंबा मिळू शकतो. मात्र, यामुळे अन्य समुदायांत असंतोष निर्माण होण्याची शक्यता आहे.

चौधरी उदयभान यांची मुख्यमंत्रीपदाची शर्यत

कुमारी सैलजा यांच्याशिवाय हरियानात दलित नेत्यांमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष चौधरी उदयभान हे देखील मुख्यमंत्रिपदाचे प्रमुख दावेदार आहेत. उदयभान हे अनेकवेळा विधानसभा निवडणुका जिंकलेले आणि काँग्रेसचे जुने नेते आहेत. पण भूपेंद्र सिंह हुड्डा यांचा पाठिंबा असल्यामुळे त्यांच्याही मुख्यमंत्रीपदाच्या दाव्याला बलकटी येऊ शकते.

भाजपने गेल्या काही वर्षांत बहुजन समाजातील नेत्यांना उच्च पदावर नेऊन बसवले आहे. उदाहरणार्थ, छत्तीसगडमध्ये विष्णु देव साय, ओडिशामध्ये मोहन चरण मांझी आणि राष्ट्रपतीपदी द्रौपदी मुर्मू यांची निवड झाली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसही दलित मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावर विचार करत असल्याचे दिसते. जर काँग्रेसने दलित नेत्याला मुख्यमंत्री बनवण्याचा निर्णय घेतला, तर हे एक मोठे राजकीय पाऊल ठरू शकते.

आगामी हरियाना निवडणुकांमध्ये काँग्रेसला सत्ता मिळाल्यास, मुख्यमंत्री पदावर कोण बसणार यावरून मोठा संघर्ष होण्याची शक्यता आहे. कुमारी सैलजा यांच्यासारखा दलित चेहरा मुख्यमंत्री होईल का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. काँग्रेसने दलित समुदायाला त्यांच्या हक्काची संधी दिली, तर राज्याच्या राजकारणात मोठा बदल होऊ शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Haryana Election Results: ''हरियानामध्ये इतिहास घडला, यापूर्वी असं कधीच झालेलं नाही'' मोदींनी सांगितलं ५० वर्षांपासूनचं समीकरण

Sports Bulletin 8th October 2024: विनेश फोगाटची हरियाना निवडणूकीत बाजी ते BCCI समोर पाकिस्तानची शरणागती

Haryana Assembly Election Result: भाजपच्या विजयामागे EVM बॅटरीचा काय संबंध? ''99 टक्के चार्जिंग असेल तर भाजपचा विजय'' काँग्रेसचे आरोप

Pune News : जिल्ह्यातील सव्वातीन लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर ६० कोटी रुपये अनुदान वर्ग

Pune News : शरद पवार यांची बोपदेव घाटात घटनास्थळी भेट

SCROLL FOR NEXT