Vinesh Phogat_BrijBhushan Sharan Singh 
Election News

Haryana Election 2024: "माझ्या सारख्या महान व्यक्तीच्या नावामुळं विनेश फोगाट जिंकली"; ब्रिजभूषणचा अजब दावा

हरयाणा विधानसभा निवडणुकीचा निकाल आता जवळपास स्पष्ट झाला आहे. यामध्ये भाजपनं ५० जागा जिंकून तिसऱ्यांदा विजयाची पताका उंचावली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : हरियाना विधानसभा निवडणुकीचा निकाल आता जवळपास स्पष्ट झाला आहे. यामध्ये भाजपनं ५० जागा जिंकून तिसऱ्यांदा विजयाची पताका उंचावली आहे. पण दुसरीकडं काँग्रेसची उमेदवार ऑलिम्पिकपटू विनेश फोगाटचा विजय झाला आहे. कुस्ती महासंघाचा माजी प्रमुख ब्रिजभूषण सिंह याच्याविरोधातील महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषण प्रकरणी आंदोलनात विनेश फोगाट प्रमुख चेहरा होती. त्यामुळं तिच्या विजयावर ब्रिजभूषण सिंहनं प्रतिक्रिया दिली आहे. "विनेश फोगाट जिंकली कारण आम्ही महान आहोत" असं त्यानं म्हटलं आहे.

हरियानातील जुलाना विधानसभा मतदारसंघातून माजी कुस्तीपटू विनेश फोगाटनं निवडणूक लढवली आणि जिंकली. तिच्याविरोधातील भाजपचे उमेदवार योगेशकुमार यांचा ६,००० मतांनी पराभव केला. तर भारतीय राष्ट्रीय लोक दलाचे उमेदवार सुरेंद्र लाठर हा या जागेवर तिसऱ्या स्थानी राहिले. तर विद्यमान आमदार अन् जननायक पार्टीचे उमेदवार अमरजीत धंधा हे थेट चौथ्या स्थानावर पोहोचले आहेत. #ElectionWithSakal

ब्रिजभूषणनं नेमकं काय म्हटलंय?

ब्रिजभूषण शरण सिंहनं म्हटलं की, "माझ्या नावाचा प्रचारात वापर करुन ती जिंकली आहे. म्हणजेच मी महान व्यक्ती आहे. कारण कमीत कमी माझ्या नावात तरी इतका दम आहे की विनेश फोगाटची नौका पार झाली. पण काँग्रेसला तर बुडवून टाकलं, त्यामुळं आता राहुल बाबाचं काय होणार?" #ElectionWithSakal

हरियानाच्या जनतेचं अभिनंदन कारण शेतकरी आंदोलन आणि महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनाच्या नावावर हरियानाच्या जनतेला भ्रमित करण्याचा मोठा प्रयत्न केला गेला. त्यानंतरही हरयानाच्या जनतेनं भाजपचं सरकारनं निवडून दिलं आहे. हे सर्व लोक अभिनंदनास पात्र आहेत, असंही पुढे ब्रिजभूषणनं म्हटलं आहे.

विनेश फोगाटची प्रतिक्रिया

आपल्या विजयावर भाष्य करताना विनेश फोगाटनं म्हटलं की, ही त्या प्रत्येक मुलीची आणि महिलेची लढाई आहे जी कायम संघर्षाचा मार्ग निवडते. या देशानं मला जे प्रेम दिलं आहे ते मी कायम कसं राहिलं याची काळजी घेईन. अजून वाट पाहा कारण सर्व जागांवरील निकाल जाहीर झालेले नाहीत. राजकारणात प्रवेश केल्यानंतर आता मी याच पक्षात राहणार आहे, असंही विनेशनं प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs IND: भारताचा वर्षातील शेवटच्या T20I सामन्यात विक्रमी विजय! द. आफ्रिकेविरुद्ध मालिकाही जिंकली

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

Rohit Sharma दुसऱ्यांदा झाला बाबा! रितिकाने दिला मुलाला जन्म; हिटमॅन आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार?

Record Breaker: Sanju Samson ची शतकासह विश्वविक्रमाला गवसणी; तिलक वर्मासह नोंदवले मोठे विक्रम अन्... Video

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

SCROLL FOR NEXT