Jyotiraditya Shinde BJP Esakal
Election News

MP Election Results : मी ज्योतिषी नाही... भाजपच्या कामगिरीचे श्रेय कोणाला? ज्योतिरादित्य शिंदेंची मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न अजूनही कायम?

मध्य प्रदेश विधानसभेत भाजपने मुसंडी मारली आहे

रोहित कणसे

madhya pradesh assembly election 2023 : मध्य प्रदेश विधानसभा निवडणूकीत सुरुवातीच्या कलांमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठी आघाडी मिळाली आहे. सुरुवातीच्या कलांप्रमाणे भाजपचे उमेदवार १५० जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस पक्ष ७८ जागांवर आघाडीवर आहे . दोन जागांवर अन्य पक्षांचे उमेदवार आहेत. यादरम्यान भाजपचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शाबासकी घेत बॅनर्स, पोस्टर लावत होते, मी सांगत होतो की अंतीम निकालाची वाट पाहा. मला पूर्ण विश्वास आहे की, जनतेचा आशीर्वाद भाजपसोबत असेल. अजून निकाल येत आहेत, शेवटचे निकाल येईपर्यंत आपण वाट पाहू. मला विश्वास आहे की, भाजपचे सरकार बहुमत नव्हे तर संपूर्ण बहुमत मिळवून सत्तेत येईल, असे ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले.

विजयाचे श्रेय कोणाला देणार?

मध्य प्रदेश विधानसभा निवडणूकीतील विजयाचे श्रेय कोणाला देणार? याबद्दल विचारले असता शिंदे म्हणाले की, मी सतत सांगत आलो आहे की, मी ज्योतिषी नाहीये. मी सांगितलं की बहुमत नाही तर संपूर्ण बहुमताने आमचं सरकार येईल. आमचं डबल इंजिन संरकार, पंतप्रधान मोदी यांचे नेतृत्व आणि जनकल्याणकारी योजना यांच्या आधारावर जनतेशी संबंध आहे. सुशासन यामुळे हा विजय मिळेल असा मला विश्वास आहे, असे भाजपचे नेते ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले.

स्पष्ट बहुमत मिळाल्यावर भाजपचा मध्यप्रदेशात मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार हा प्रश्न सध्या चर्चेत आहे. मध्य प्रदेशात यावेळी भाजपकडून शिवराज सिंह चौहान, ज्योतिरादित्य शिंदे आणि कैलाश विजयवर्गीय हे तीन नावे चर्चेत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे पाहावे लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jefferies Stocks: शेअर बाजार कोसळतोय; गुंतवणूक कुठे करावी? जेफरीजने सांगितले हे 14 स्टॉक खरेदी करा, होताल मालामाल

Latest Maharashtra News Updates live : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मतदान केंद्रावरील भाजपाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार

Assembly Election 2024: बीडच्या पोलिसाचा मुंबईत कारनामा! टपाली मतदानाचे फोटो गावाकडे पाठवले, गुन्हा दाखल

'मुश्रीफ ED ला घाबरून भाजपच्या पंक्तीत बसले, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, निवडणुकीत त्यांना पाडा'; शरद पवारांचा हल्ला

IPL Mega Auction 2025: सातवीत शिकणाऱ्या Vaibhav Suryavanshiला डिमांड; जाणून घ्या १३ वर्षीय पोराची कमाल...

SCROLL FOR NEXT