R. Ashok Karnataka Election 2023 news sakal
Election News

Karnataka Election 2023: अशोक यांना कोंडीत पकडण्याची काँग्रेसची रणनीती

महसूलमंत्री आर. अशोक यांना त्यांच्याविरोधात उमेदवारी दिली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Karnataka Election 2023 News: मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आघाडीवर असलेल्या डी. के. शिवकुमार यांना कनकपूर मतदारसंघात बांधून ठेवण्यासाठी भाजपने रणनीती आखली आहे. महसूलमंत्री आर. अशोक यांना त्यांच्याविरोधात उमेदवारी दिली आहे.

त्यामुळे अशोक आपल्या मूळ पद्मनाभनगर मतदारसंघाबरोबरच कनकपूर मतदारसंघातही निवडणूक लढविणार आहेत. त्याला प्रत्युतर म्हणून आता शिवकुमार यांचे बंधू खासदार डी. के. सुरेश यांना अशोक यांच्याविरोधात उतरविले जाणार आहे.

-बी. बी. देसाई

पद्मनाभनगरातून अशोक सलग तीन वेळा निवडून आले आहे. या मतदारसंघावर त्यांची पकड आहे. त्यामुळे या मतदारसंघात विजय मिळवणे सोपे जाईल, असा विश्वास अशोक यांना आहे. त्यामुळे कनकपूर मतदारसंघात अशोक यांच्यासारख्या प्रभावी मंत्र्याला उभे करून शिवकुमार यांना अडचणीत आणण्याची रणनिती भाजप हायकमांडची आहे.

जरी अशोक यांना विजय मिळाला नाही, तरी तोडीसतोड लढतीमुळे शिवकुमार आपल्या मतदारसंघातच राहातील आणि इतर मतदारसंघाकडे लक्ष देण्यास त्यांना वेळ मिळणार नाही, अशी भाजप हायकमांडची खेळी आहे. त्यामुळे अशोक यांना पद्मनाभनगरबरोबरच शिवकुमार यांच्याविरुद्ध कनकपुरातही रिगणात उतरविले आहे.

आता अशोक यांना पद्मनाभनगर मतदारसंघात अडवण्याची गणिते काँग्रेसने आखली आहेत. निवडणुकीतील स्पर्धा चुरशीची होत असल्याने शिवकुमार यांनी आपली रणनीती बदलली आहे. सुरुवातीला ठरल्याप्रमाणे त्यांनी आपले बंधू खासदार डी. के. सुरेश यांना पद्मनाभनगरमध्ये उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला.

त्यामुळे याआधी बी फॉर्म प्राप्त झालेल्या रघुनाथ नायडू यांना उमेदवारी अर्ज सादर न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याऐवजी सुरेश उमेदवारी अर्ज दाखल करतील. भाजपच्या डावावर प्रतिडाव म्हणून कॉंग्रेसने अशोक यांच्या विरोधात खासदार सुरेश यांना उमेदवारी दिल्याने लढत चांगलीच चुरशीची होण्याची अपेक्षा आहे. परिणामी अशोक यांना सहज विजय मिळणे अवघड होणार आहे.

अशोक यांची हॅट्‌ट्रिक

पुनर्रचनेपूर्वी देशातील सर्वात मोठा राज्य विधानसभा मतदारसंघ असलेल्या उत्तरहळ्ळी येथून १९९७ च्या पोटनिवडणुकीत अशोक प्रथम विधानसभेवर निवडून आले. १९९९ आणि २००४ च्या विधानसभा निवडणुकीत ते त्याच मतदारसंघातून फरकाने निवडून आले.

२००४ च्या निवडणुकीत त्यांनी ८१ हजार एक मतांच्या फरकाने विजय मिळवला. जो कर्नाटकातील आजवरच्या विधानसभा निवडणुकीतील सर्वाधिक फरक आहे. पुढे २००८, २०१३ व २०१८ च्या निवडणुकात ते पद्मनाभनगर मतदारसंघात सलग तीन वेळा ते निवडून आले आहेत.

निवडणुकीत सतत वरचष्मा

२०१८ मध्ये दोन लाख ७८ हजार २२३ मतदार होते. एक लाख ६१ हजार ६०८ मतदान झाले. भाजपचे उमेदवार आर. अशोक ७७ हजार ८६८ मते मिळवून विजयी झाले.

धजदचे उमेदवार व्ही. के. गोपाल ४५ हजार ७०२ मतांसह दुसऱ्या स्थानावर राहिले.

अडीच लाख मतदार

पद्मनाभनगर (जनरल) हा बंगळूर शहर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ आणि बंगळूर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे.

मतदारसंघात दोन लाख ६७ हजार ८६९ मतदार आहेत. त्यात एक लाख ३७ हजार ८७० पुरुष, एक लाख २९ हजार ९८२ महिला आणि १३ इतर मतदार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Latest Maharashtra News Updates : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, पडद्यामागील घडामोडींना येणार वेग

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

आज सायंकाळी 6 वाजता थंडावणार प्रचाराच्या तोफा! मतदानापूर्वीच्या 30 तासातील हालचालींवर भरारी पथकांचा वॉच; बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान

SCROLL FOR NEXT