सलग पाचवेळा विजय मिळवीत मतदार संघावर पकड निर्माण केलेल्या भालचंद्र जारकीहोळी यांना अरभावी मतदार संघातून परत उमेदवारी जाहीर झाली आहे.
सलग पाचवेळा विजय मिळवीत मतदार संघावर पकड निर्माण केलेल्या भालचंद्र जारकीहोळी यांना अरभावी मतदार संघातून परत उमेदवारी जाहीर झाली आहे. तगड्या भाजप उमेदवार विरोधात कॉंग्रेसकडून तुल्यबळ उमेदवाराचा शोध सुरु आहे. कॉंग्रेसच्या तिसऱ्या यादीत त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र, अरभावी भाजपचा सुरक्षित गड ठरला असून, त्याला भेदण्याचे शिवधनुष्य कॉंग्रेसला पेलणार का? याची औत्सूक्यता आहे.
काँग्रेसच्या बालेकिल्याला खिंडार पाडत पहिल्यांदा धजद, त्यानंतर भाजपातून विजय मिळवत आरभावी विधानसभा मतदारसंघामधून भाजपचे आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी सलग पाचवेळा विजय मिळविला आहे. भालचंद्र यांची घोडदौड रोखण्याचे आव्हान काँग्रेसपुढे आहे. अरभावी मतदार संघावर अनेक वर्षे काँग्रेसचे वर्चस्व होते. मात्र, आमदार जारकीहोळी यांनी विजय मिळवीत पहिल्यांदा धजदला आणि त्यानंतर भाजपला यश मिळवून दिले आहे. जिल्ह्यातील सर्वात प्रभावी आणि सर्वाधिक मताधिक्यांनी विजय मिळविणारे आमदार अनेकदा ठरले आहे. त्यावरून त्यांची मतदार संघावरील पकड आधोरेखीत होते.
मतदारसंघाची स्थापना १९६७ मध्ये झाली. तेव्हापासून १९९९ पर्यंत निर्विवाद येथून कॉग्रेस उमेदवारांनी बाजी मारली. १९६७ मध्ये विधानसभा निवडणुकीत ए. आर. पंचगावी यांनी कॉंग्रेसला विजय मिळवून दिला. यानंतर निवडणुकीत तब्बल सहावेळा व्ही. एस. कौजलगी कॉंग्रेसला विजय मिळवून देण्यात यशस्वी ठरले. यामुळे काँग्रेसचा बालेकिल्ला ठरला होता. मात्र, त्याला भालचंद्र जारकीहोळी यांनी खिंडार पाडले. धजद उमेदवारीवर पहिल्यांदा २००४ मध्ये निवडून आले.
अरभावी मतदारसंघातून सहावेळा विजय मिळविलेल्या कौजलगी यांचा पराभव करून पहिल्यांदा युवा चेहरा म्हणून भालचंद्र यांना जनतेने कौल दिला. नंतर २००८ मध्ये झालेल्या निवडणुकीत परत त्यांनी विजय मिळविला. पण, त्याचवर्षी राज्यात ऑपरेशन कमळ झाले आणि यात जिल्ह्यातील विविध आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तेव्हा भालचंद्र जारकीहोळी यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. पोटनिवडणुकीत भाजप उमेदवारीवर पहिल्यांदा मतदार संघातून २००८ मध्ये कमळ फुलविले. तीन निवडणुकीत पक्षाला यश मिळत राहिले आहे. त्यामुळे भालचंद्र यांनी मतदार संघात करिष्मा घडविला आहे. तेव्हापासून जारकीहोळी अपराजित राहिले आहेत. त्यामुळे भालचंद्र यांची घोडदौड रोखण्यासाठी काँग्रेसकडून रणनिती आखली जात आहे. कॉंग्रेसला गतवैभव मिळवून देण्यासाठी तगड्या उमेदवारांचा शोध पक्षाकडून सुरु आहे.
लिंगायत समुदाय मोठा
गोकाक आणि अरभावीत परत कॉंग्रेसला गतवैभव मिळवून देण्यासाठी कॉंग्रेसकडून काही वर्षात खूपदा प्रयत्न झाले. पण, जारकीहोळी बंधूच्या वर्चस्वामुळे शक्य झाले नाही. त्याचाच भाग म्हणून आरभावी मतदारसंघात अलीकडे पंचमसाली समुदायाचा मेळावा झाला. याद्वारे भालचंद्र यांना आव्हान देण्याची तयारी झाली. मात्र, लिंगायत मेळाव्याचा कितपत परिणाम जाणवितो, हे पाहावे लागेल. मतदार संघात लिंगायत समुदाय मोठा आहे. यापाठोपाठ धनगर, उप्पार समुदाय आहे.
अरभावीतील मतदार संख्या
पुरुष मतदार - १,२०,३८०
महिला मतदार - १,१९,२९३
एकूण - २,३९,६७३
मतदान केंद्र - २८१
एक नजर
मतदार संघातून कॉंग्रेस उमेदवारांचा ९, धजद २ व भाजपला ३ वेळा विजय
काँग्रेसतर्फे लिंगायत उमेदवार आखाड्यात उतरविण्याची तयारी
भालचंद्र जारकीहोळी सलग पाचवेळा विजयी
लिंगायत, धनगर वर्गाची संख्या सर्वाधिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.