Madhya Pradesh election 2023 result marathi shivraj singh chauhan ladli bahna yojana its benefits marathi news  eSakal
Election News

Laadli Behna Yojna: मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंह यांना जिंकवून देणारी 'लाडली बहना योजना' नेमकी आहे तरी काय?

लाडली बहिना योजना: मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंह यांना जिंकवून देणारी 'लाडली बहना योजना' नेमकी आहे तरी काय?

रोहित कणसे

देशातील पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहेत. यापैकी मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपचा दबदबा दिसून येत आहे. मध्य प्रदेशात या निवडणूकीत भाजपने जबरदस्त आघाडी घेतली असून जवळपास विजय मिळवला आहे. या विजयामागील सर्व कारणांपैकी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांची 'लाडली बहना योजना' (Laadli Behna Yojna) ही ट्रम्प कार्ड मानली जात आहे.

ही योजना शिवराज सिंह चौहान यांनी निवडणुकीपूर्वी सुरू केली होती. या योजनेत नेमकं काय खास आहे आणि महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी या योजनेने कसे काम केले? हे आपण जाणून घेऊयात. (Madhya Pradesh Assembly Election 2023 Results In Marathi)

भाजपला मध्य प्रदेशात विजय खेचून आणण्यात शिवराज सिंह यांच्या नेतृत्वाखाली मध्य प्रदेशात राबविण्यात आलेल्या लोककल्याणकारी योजनांचा फायदा झाला. समोर आलेल्या निकालांमधून या योजनांचा जनतेला लाभ झाल्याचे दिसून य़ेत आहे.

मध्य प्रदेशातील शिवराज सिंह चौहान सरकारने २८ जानेवारी २०२३ रोजी 'मुख्यमंत्री लाडली बहना योजना' जाहीर झाली आणि १५ मार्च रोजी ही योजना लाँच करण्यात आली. महिलांचे आर्थिक स्वावलंबन, त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांचे संगोपन आणि कुटुंबातील महिलांची स्थिती मजबूत करण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली होती.

योजनेत मिळणारे लाभ कोणते?

मध्य प्रदेश येथे या योजनेअंतर्गत सुरुवातीला लाभार्थी महिलांना दरमहा एक हजार रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती, ती सहा महिन्यांनंतर मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी वाढवून १२५० रुपये केली.

राज्यातील एक कोटीहून अधिक महिलांना सध्या या योजनेचा लाभ मिळत आहे. त्यानुसार महिलांना वर्षाकाठी १५ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.

येत्या काळात ही रक्कम तीन हजार रुपयांपर्यंत नेण्याची योजना असल्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी नुकतेच एका ट्विटद्वारे सांगितले होते. या योजनेअंतर्गत दर महिन्याच्या १० तारखेपर्यंत थेट लाभ हस्तांतरणाद्वारे (डीबीटी) लाभार्थीच्या खात्यात पैसे पाठवले जातात.

लाडली बहना योजनेसाठी पात्रता

  • महिलेचे वय २१-६० वर्षे असावे.

  • जे आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.

  • ज्या महिलांकडे ५ एकर किंवा त्यापेक्षा कमी जमीन आहे अशा महिला पात्र आहेत.

  • ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी आहे.

  • विवाहित, विधवा, घटस्फोटित आणि परित्यक्ता महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

  • लाडली बहिना योजनेसाठी सर्व जाती गटातील गरीब महिला अर्ज करू शकतात आणि त्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा नाही, म्हणजेच या योजनेसाठी तुम्ही ऑफलाइन अर्ज करू शकता. योजनेचे अर्ज ग्रामपंचायत, प्रभाग कार्यालय मिळतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT