Mohan Bhagwat esakal
Maharashtra Assembly Election 2024 News and voting updates

Maharashtra Assembly Election 2024: मोठी बातमी! संघ थेट प्रचारात उतरणार? ७० दिवसांचा मेगा प्लॅन रेडी; पण फायदा कुणाला?

Mohan Bhagwat: लोकसभा निवडणुकांचे निकाल हाती आल्यानंतर संघाने भाजपला धारेवर धरले होते. निवडणुकीत अपेक्षित यश न मिळण्याच्या कारणांची मिमांसा केली होती. त्यातही महाराष्ट्रात अजित पवार यांना सोबत घेतल्याने काय नुकसान झालं, याचीही जाहीर वाच्यता संघाने केली होती. त्यामुळे संघ आता आपल्या भूमिकेवर ठाम राहणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

संतोष कानडे

नागपूरः विधानसभेच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. प्रत्येक पक्षाच्या उमेदवारी निवडीबाबतच्या बैठका अंतिम टप्प्यात आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीकडून उमेदवारांची पहिली यादी पुढच्या आठवड्यात जाहीर होऊ शकते. या धामधुमीत एक महत्त्वाची माहिती पुढे येतेय.

राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ थेट प्रचारात उतरणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यासाठी संघाने एक दोन नव्हे तर तब्बल १२ आघाड्या उघडल्या आहेत. या माध्यमातून समाजातल्या विविध घटकांपर्यंत पोहोचण्याचं काम ७० दिवसांमध्ये होणार आहे.

संघाने थेट विधानसभा निवडणूक प्रचाराच्या मैदानात उतरण्याची भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. १२ आघाड्यांच्या माध्यमातून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मराठा, हिंदूत्व, महिला, शेतकरी, तरुण, ग्रामीण भाग, शहरी भाग, भटके विमुक्त, मुस्लिम समाज या घटकांवर संघ लक्ष केंद्रित करणार आहे.

लोकसभा निवडणुकांचे निकाल हाती आल्यानंतर संघाने भाजपला धारेवर धरले होते. निवडणुकीत अपेक्षित यश न मिळण्याच्या कारणांची मिमांसा केली होती. त्यातही महाराष्ट्रात अजित पवार यांना सोबत घेतल्याने काय नुकसान झालं, याचीही जाहीर वाच्यता संघाने केली होती. त्यामुळे संघ आता आपल्या भूमिकेवर ठाम राहणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

'या' मुद्द्यांवर संघाचं लक्ष

  • 'साम टीव्ही'च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फेक नरेटिव्हला उत्तर देण्यासाठी संघ आणि भाजप परिवार सोशल माध्यमांचा वापर प्रभावीपणे करणार आहे. त्यासाठी विविध समित्यांच्या माध्यमातून फेक नरेटिव्हला उत्तर देणारी माहिती जनतेपर्यंत पोहचवण्यात येणार आहे.

  • राज्यभरासह विदर्भातील अनेक मतदारसंघात बैठका घेऊन जनमत तयार करण्यासाठी काम करण्यात येणार असून आगामी 70 दिवसाचा संघ परिवाचा गेमप्लॅन असणार आहे.

  • मुस्लिमांसह अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मराठा, हिंदूत्व, महिला, शेतकरी, तरुण, ग्रामीण भाग, शहरी भाग, भटके विमुक्त यांना भाजपकडे आकर्षित करण्यासाठी संघाने तयारी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Elections Results: राज्यात सत्ता स्थापनेसाठी बंडखोर ठरणार किंग मेकर! महाविकास आघाडीची रणनीती ठरली, काल मुंबईत काय घडलं?

Mumbai Local News: मुंबईकरांनो लक्ष द्या, आज तीन तासांचा ब्लॉक!

Maharashtra Winter Update: थंडीपासून जरा जपूनच, निच्चांकी तापमान 10 अंशांवर; राज्य गारठलं!

AUS vs IND 1st Test: बुमराहने जिंकला टॉस! नितीश रेड्डी अन् हर्षित राणाचे भारताकडून पदार्पण; पाहा 'प्लेइंग-11'

Sakal Podcast: दहावी-बारावीच्या परीक्षांचं अंतिम वेळापत्रक जाहीर ते पुढचा मुख्यमंत्री देशमुखांच्या घरातलाच?

SCROLL FOR NEXT