Chhatrapati Sambhajinagar Vidhan Sabha elections 2024 sakal
Maharashtra Assembly Election

Assembly Elections 2024 : विधानसभेला जिल्ह्यात वाढले ५५ हजार मतदार

सकाळ डिजिटल टीम

छत्रपती संभाजीनगर: विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी यंत्रणा गेली काही दिवसांपासून जोमाने कामाला लागली आहे. प्रारूप यादीवरील आक्षेप, हरकती निकाली काढून नुकतीच अंतिम मतदारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. प्रारूप यादीच्या तुलनेत ५५ हजार ३१४ ने मतदार संख्या वाढून जिल्ह्यातील मतदार संख्या ३१ लाख ४५ हजार २०३ एवढी झाली आहे. यापैकी ७० हजार २४२ नवमतदार आहेत.

१ जुलै २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्या तयार करण्यात आल्या. प्रारूप मतदार यादी जाहीर झाली तेव्हा जिल्ह्यातील मतदारांची संख्या ३० लाख ८९ हजार ८८९ होती. त्यात पुरुष १६ लाख १८ हजार ९४ तर महिला मतदारांची संख्या १४ लाख ७१ हजार ६५९ इतकी होती. तसेच, इतर १३६ होते.

या प्रारूप यादीच्या तुलनेत अंतिम यादीत मतदारांची संख्या ५५ हजार ३१४ ने वाढली आहे. अंतिम यादीनुसार आता जिल्ह्यातील मतदारांची एकूण संख्या ३१ लाख ४५ हजार २०३ इतकी झाली आहे. यात १६ लाख ३९ हजार ६४० पुरुष, १५ लाख ५ हजार ४२३ महिला, तर १४० इतर मतदार आहेत.

२० हजार नावे वगळली

अंतिम यादी करताना दुबार नावे, स्थलांतरित झालेले मतदार अशी २० हजार ५४५ मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत. तर, २२ हजार ७३१ मतदारांच्या नावांमध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यात १८ ते १९ वयोगटातील नवमतदारांची संख्या आता ७० हजार २४२ एवढी झाली आहे.

यात सिल्लोड विधानसभा मतदारसंघात ९ हजार २२४, कन्नड ६ ५८१, फुलंब्री ७ हजार ७२१, औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) मध्य ८ हजार ४६०, पश्चिममध्ये ९ हजार २३९, पूर्व मतदारसंघात ७ हजार ३२९, पैठण ६ हजार ८८५, गंगापूर ७ हजार ९७० आणि वैजापूर विधानसभा मतदारसंघात ६ हजार ८३३ एवढे नवमतदार आहेत. तर, २७ हजार १८८ दिव्यांग मतदार असल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके यांनी सांगितले.

मतदारसंघनिहाय मतदार-विधानसभा मतदारसंघ - मतदार संख्या

  • औरंगाबाद मध्य......३६४२९१

  • पश्चिम ...........३९९३२५

  • पूर्व..................३४७०५३

  • सिल्लोड ......३५०१६४

  • कन्नड ..........३२८१९५

  • फुलंब्री..........३६३२९९

  • पैठण ..........३१९८१५

  • गंगापूर........३५७१९०

  • वैजापूर........३१५८७१

#ElectionWithSakal

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajeev Kumar on Media Trends: एक्झिट पोल्सचा फेक डेटा दाखवण्याचा अट्टाहास? मुख्य निवडणूक आयुक्त मीडिया ट्रेन्ड्सवर भडकले

Election Commission : पेजरचे स्फोट होतात, मग EVM कसे हॅक होणार नाहीत... निवडणूक आयोगाने दिलं उत्तर

PAK vs ENG: सईम आयूब, कामरान घुलाम या नवख्या खेळाडूंनी पाकिस्तानला सावरले; पहिल्या दिवसाअंती केल्या २५९ धावा

Baba Siddique : म्हणून शाहरुख बाबा सिद्दिकीच्या अंत्यसंस्काराला राहिला गैरहजर ; जाणून घ्या कारण

Latest Maharashtra News Updates : निवडणूक आयोगाने वायनाड लोकसभा जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर

SCROLL FOR NEXT