Assembly Elections ESakal
Maharashtra Assembly Election

बैठकीला नाना पटोले उपस्थित असतील तर...; ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये बिनसलं? जागांचा वाद विकोपाला

Vrushal Karmarkar

महाराष्ट्रात जागावाटपावरून सुरू असलेल्या राजकीय गदारोळात शिवसेना उद्धव ठाकरे गटाने मोठा निर्णय घेतला आहे. उद्धव ठाकरेंचा पक्ष आता काँग्रेस हायकमांडशी थेट जागावाटपाबाबत चर्चा करणार आहे. याबाबत संजय राऊत लवकरच राहुल गांधींशी बोलण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे जागावाटपासाठी झालेल्या बैठकीत ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये बिनसल्याची चर्चा रंगत आहेत. यामुळे आता ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे.

महाराष्ट्र काँग्रेसचे नेते जागावाटपाचा निर्णय घेऊ शकत नाहीत, अशी ठाकरे गटाने सांगितलं आहे. नामांकनाची तारीख जवळ आली आहे. अशा परिस्थितीत आता आपण थेट राहुल गांधींशी चर्चा करणार आहोत. संजय राऊत यांनी काँग्रेस संघटनेचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांच्याशीही चर्चा केली आहे. ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यातील जागावाटावरील वाद आता चव्हाट्यावर आला आहे. काँग्रेस नेते नाना पटोले या पुढे महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या बैठकीला उपस्थित असतील तर ठाकरे गटाचे नेते त्या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत, असा आक्रमक पवित्रा ठाकरे गटाकडून घेण्यात आला आहे.

महाविकास आघाडीचे जागावाटप हे नाना पाटोले यांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे अडचणीचे ठरत असल्याचं ठाकरे गटाच्या नेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांनी आता ही भूमिका घेतली आहे. ठाकरे गट आणि पटोले असा वाद विकोपाला गेला आहे. मुंबई आणि विदर्भातील जागांवरून शिवसेना आणि काँग्रेसमध्ये चुरस असल्याचे बोलले जात आहे. शिवसेना ठाकरे गट विदर्भात जास्त जागांची मागणी करत आहे.

त्याचवेळी मुंबईतील त्या जागांवर काँग्रेसची नजर आहे, जिथे गेल्या वेळी ते दुसऱ्या क्रमांकावर होते. शिवसेना ठाकरे गट मुंबईत मोठा भाऊ राहण्याचा प्रयत्न करत आहे. मुंबईत विधानसभेच्या 36 जागा असून पक्षाला किमान 20 जागांवर निवडणूक लढवायची आहे. तसेच शिवसेनेला नागपूर आणि अमरावतीमध्येही आपला वाटा हवा आहे. काँग्रेसला हे मान्य नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Helicopter: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोडक्यात बचावले! हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँडिंग; काय घडलं नेमकं? जाणून घ्या

Vidhansabha Election 2024 : महायुतीत ४५ जागांच्या वाटपावर खल; जागा सोडण्यावरून स्थानिक पदाधिकारी आक्रमक

Sports News on 18th October 2024: भारताचे कसोटी सामन्यात पुनरागमन ते पाकिस्तानचा इंग्लंडविरूद्ध दणदणीत विजय

रणबीर- आलियाच्या बांद्रामधील घराची पहिली झलक समोर; नेटकऱ्यांनी केल्या भन्नाट कमेंट, म्हणाले- हे काय बनवलंय भाऊ..

Diwali Recipe : दिवाळीत नुसता चिवडा बेचव लागतो, विकतची कशाला घरी अशी बनवा कुरकुरीत शेव

SCROLL FOR NEXT