Bhokardan Vidhan Sabha Elections 2024 sakal
Maharashtra Assembly Election 2024 News and voting updates

Assembly Elections 2024: भोकरदनमध्ये 'राष्ट्रवादीची तुतारी' कोण फुंकणार ?

Bhokardan Vidhan Sabha Elections 2024: इच्छुकांनी पुण्यात जाऊन दिल्या मुलाखती, उमेदवारीसाठी मोठी रस्सीखेच...

तुषार पाटील, सकाळ वृत्तसेवा

भोकरदन: महाविकास आघाडीत भोकरदन विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीकडे (शरदचंद्र पवार पक्ष) आहे, परंतु गेल्या दोन निवडणुकांमध्ये पक्षाला येथे पराभव स्वीकारावा लागला. दरम्यान, लोकसभेत रावसाहेब दानवे यांचा दारुण पराभव झाला.

त्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले; तसेच मराठा आरक्षण, जरांगे फॅक्टर महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडल्यानंतर आता आमदार संतोष दानवे यांना महाविकास आघाडीकडून टार्गेट करण्यात आले आहे. राष्ट्रवादीकडून येथे इच्छुकांची संख्या मोठी असून, त्यामुळे तिकीट जाहीर झाल्यानंतरच भाजपविरोधात तुतारी कोण फुंकणार? हे स्पष्ट होणार आहे.

शनिवारी (ता. पाच) पुणे येथे पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निसर्ग बंगल्यावर इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या. राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेखा लहाने, जाफराबादचे तालुकाध्यक्ष रामधन कळंबे, लोकजागर अभियानाचे अध्यक्ष केशव जंजाळ, श्रीरंग जंजाळ या चार उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. सुरेखा लहाने यांनी महिला उमेदवाराला प्राधान्य दिले जावे, असे सांगत शैक्षणिक पात्रतेचा विचार करता संधी मिळावी, अशी अपेक्षा केली; तसेच आपण डमी उमेदवार नसून, स्वकर्तृत्वावर उमेदवारी मागत असल्याचा दावा केला.

केशव जंजाळ यांनी तालुक्यात गेल्या पंधरा वर्षांत चंद्रकांत दानवे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कशा पद्धतीने पीछेहाट झाली, याचा पाढाच वाचला. इतरांनी काय केले व पक्षाची काय अवस्था आहे, हे सांगण्यापेक्षा येणाऱ्या निवडणुकीत तुमच्या जमेच्या बाजू, तुम्ही कशा पद्धतीने निवडून येणार व तुम्हालाच का उमेदवारी द्यावी, हे फक्त स्पष्ट करा, अशी समज माजी मंत्री राजेश टोपे यांनी दिली. मुलाखतीला शरद पवार यांच्यासह आमदार रोहित पवार, माजी मंत्री राजेश टोपे व राष्ट्रवादीच्या सर्व सेलचे प्रमुख उपस्थित होते.

मुलाखतीला माजी आमदार पोचले उशिरा?

सकाळी अकराला सुरू झालेल्या मुलाखतीला माजी आमदार चंद्रकांत दानवे हे तब्बल दोन तास उशिराने पोचल्याचे सूत्रांनी सांगितले. ज्यावेळेस ते मुलाखतीला पोचले, तोपर्यंत परभणी जिल्ह्यातील मुलाखती सुरू झालेल्या होत्या. याबाबत ‘सकाळ’ने विचारले असता ट्रॅफिकमुळे फक्त काही मिनिटांचा उशीर झाला, असे ते म्हणाले.

मी जरी लेट झालेलो असलो, तरी मला सर्वाधिक १७ मिनिटांचा वेळ दिला, तर इतरांना फक्त दोन मिनिटे देण्यात आले. भोकरदन मतदारसंघातील सर्व्हेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सर्वाधिक पसंती मलाच असल्याचा दावा त्यांनी केला. आमदार रोहित पवार यांनी इतरांच्या तुलनेत मला पसंती दिल्याचे त्यांनी सांगितले.

#ElectionWithSakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT