Parbhani Vidhan Sabha elections 2024 sakal
Maharashtra Assembly Election

Parbhani Assembly Elections 2024: परभणी विधानसभेची जागा भाजपला; उमेदवारी देण्याचा निर्णय गुलदस्त्यात..

सकाळ वृत्तसेवा

परभणी: आगामी विधानसभा निवडणुकीत परभणीची जागा महायुतीमधून भाजपच्या वाट्याला आल्याचा दावा भाजप नेत्यांनी केला आहे. पक्षश्रेष्ठींनी या निर्णयावर शिक्कामोर्तब केल्याची माहिती भाजप उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद वाकोडकर यांनी दिली.

मात्र, उमेदवारी कुणाला द्यायची? याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, असेही वाकोडकर यांनी सांगितले.

परभणी विधानसभा भाजपच्या ताब्यात आल्याने कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. शुक्रवारी (ता. १३) शहरातील शिवाजी चौकात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत आनंदोत्सव साजरा केला. भाजपकडून परभणी विधानसभेसाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे.

विधानसभा अध्यक्ष आनंद भरोसे, भाजपचे ज्येष्ठ नेते विजयराव वरपुडकर, प्रमोद वाकोडकर, शहर जिल्हाध्यक्ष राजेश देशमुख, सुरेश भुमरे, डॉ. केदार खटिंग यांची नावे चर्चेत आहेत. मात्र, अद्याप कोणाच्याही उमेदवारीवर पक्षाने निर्णय घेतलेला नाही. यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला होता. तरीही चांगली मते मिळाल्यामुळे भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे.

परभणीची जागा कमळवारच लढवणार..

परभणी विधानसभेची जागा महायुतीतून भाजपच्या वाट्याला आली आहे. आता ही जागा कमळ चिन्हावरच लढवली जावी, असा आमचा आग्रह आहे.

: प्रमोद वाकोडकर, प्रदेशाध्यक्ष, उद्योग आघाडी, भाजप.

#ElectionWithSakal

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: सभा आटपून निघाले, पोलिसांच्या ताफ्यात दिसला जुना मित्र, गाडी थांबवली अन्... मोहोळ यांच्या कृतीची सर्वत्र चर्चा

Women's T20 World Cup 2024: भारताविरूद्धच्या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाने कर्णधार बदलली, निर्णायक सामन्यासाठी असे आहेत 'प्लेइंग-११'

कंपनी असावी तर अशी! दिवाळीचं गिफ्ट म्हणून कर्मचाऱ्यांना वाटल्या बाईक अन् मर्सिडीज, टाटा-मारुतीच्या गाड्या

भारताच्या अहिका-सुतिर्थाने रचला इतिहास; Asian Table Tennis Championships स्पर्धेत जिंकले पहिले दुहेरी पदक

Bee Attack : किल्ले राजगडावर मधमाशांचा पर्यटकांवर हल्ला, पंचवीस ते तीस पर्यटक किरकोळ जखमी

SCROLL FOR NEXT