माहूर: हल्ली राजकारणात जातीय समीकरण प्रामुख्याने विजयाच्या गणितासाठी आवश्यक असते. माहूर किनवट मतदारसंघात दोन तुल्यबळ जातीचे सगळे उमेदवार मागील तीन पंचवार्षिक एकमेकांना कडवी झुंज देत असल्याचा इतिहास आहे.
या मतदारसंघात बंजारा मतदार ८० हजाराच्या जवळपास तर आदिवासी ६० हजाराच्या जवळपास आहे. मात्र, आदिवासी समाजापेक्षा बंजारा समाजामध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर किमान डझनभर इच्छुक पुढे आले आहेत. त्यामुळे मतांचे ध्रुवीकरण कोणाच्या मुळावर उठणार अशी चर्चा मतदारसंघात आहे ?
इच्छुक उमेदवारांनी विविध पक्ष, मित्र मंडळांच्या नावाने जनसंपर्क वाढविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या उलट आदिवासी समाजातील एकही इच्छुक उमेदवार अजून तरी ३३० बूथपैकी एकाही बूथला भेट दिल्याचे ऐकायला मिळत नाही.
त्यामुळे राजकीय जाणकारांच्या मते प्रदीप नाईकांच्या आमदारकीला हे गतिरोधक आहे. महाविकास आघाडीचे सरकार आल्यास नाईक यांच्या रूपाने मिळणारे मंत्रिपद हुकणार काय? अशी चर्चा आहे.
किनवट माहूर मतदारसंघात निवडणुकीचे वारे मागील तीन महिन्यांपासून वेगाने वाहू लागले आहे. बंजारा समाजातील नवनवीन चेहरे आमदारकीसाठी पुढे येत असून किमान डझनभर इच्छुक तरी विधानसभेच्या मैदानात उतरतील, असे सध्याचे चित्र आहे. यात बंजारा समाजातील भाजप उमेदवारीच्या रांगेत धरमसिंग राठोड, ॲड. अविनाश राठोड, संध्या प्रफुल राठोड. तर काँग्रेसकडून आकाश सुभाष जाधव. माकपचे अर्जुन आडे.
मित्र मंडळाच्या नावाने सचिन नाईक, शरद राठोड. मनसेचे रवी राठोड यांच्यासह काही अजून इच्छुक मंडळी आहे. इच्छुकांची मांदियाळी बघता ही निवडणूक जातीच्या आधारावर लढली जाणार असल्याचे दिसून येते. त्यामुळे ८० हजार मतदारांना ६० हजार मतदारांचे मोठे आव्हान असणार आहे. बंजारा समाजाच्या मतांचे ध्रुवीकरण कोणाच्या विजयाला ब्रेक लावणार? हे निवडणुकीच्या काळातच कळणार आहे. बंजारा समाजातील मंदिरापुढील गोना परंपरा विसरून चालणार नाही, हेही तेवढेच खरे.
#ElectionWithSakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.