Devendra Fadnavis And Sharad  Esakal
Maharashtra Assembly Election

Devendra Fadnavis: विधानसभा जाहीर होताच फडणवीसांनी दिले शरद पवारांना चॅलेंज; उपमुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?

आशुतोष मसगौंडे

राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडीने जोरदार तयारी सुरू केली आहे. अशात महायुती सरकारने त्यांनी त्यांच्या कार्यकाळात कोणकोणती कामे केली याचे रिपोर्ट कार्ड प्रकाशित केले आहे.

या प्रकाशन कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांना त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करावा असे आव्हान दिले आहे.

दरम्यान रिपोर्ट कार्डच्या प्रकाशनावेळी देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या जागावाटपाबाबतही माहिती दिली. ते म्हणाले की, "आमचे जागावाटप जवळपास झाले आहे. अगदी बोटावर मोजण्या इतकं जागा राहिल्या आहेत. कोणाचा उमेदवार कुठे स्ट्रॉंग आहे हे बघून आमचे जागावाटप सुरू आहे."

दरम्यान महायुतीमध्ये सर्वाधिक जागा भाजप लढवणार हे नक्की असले तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाला किती जागा मिळणार याचा आकडा अद्याप समोर आलेला नाही.

हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुका संपल्यानंतर आता झारखंड आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमध्ये निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. झारखंडमध्ये दोन टप्प्यात मतदान प्रक्रिया पूर्ण होणार आहे. पहिल्या टप्प्यात १३ नोव्हेंबरला आणि दुसऱ्या टप्प्यात २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. 23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहेत.

तर महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत. 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 23 तारखेला निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबर 2024 रोजी संपत आहे.

महाराष्ट्रात सध्या महायुतीचे सरकार असून त्यात शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा समावेश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Elections 2024: मोठी बातमी; 'मविआ'चा जागा वाटपाचा तिढा सुटला, काँग्रेस ठरला 'मोठा भाऊ'

Maharashtra Election: महायुती सरकारनं काढलेला SC-ST उपवर्गिकरणासंबंधीचा जीआर रद्द होणार? राज्य निवडणूक अधिकाऱ्यांचे संकेत

IPL 2025 News : दिल्ली कॅपिटल्स फक्त ३ खेळाडूंना रिटेन करणार, नावं समजली; कोचच्या पदासाठी भारताचा माजी फलंदाज आघाडीवर

Latest Maharashtra News Updates : वाघोली, खराडी भागात पावसाला सुरुवात

Buldhana Assembly Election 2024 : दिवाळीच्या थंडीत राजकारण तापणार! फटाके कोण फोडणार आणि कुणाला लागणार याचीच सर्वत्र चर्चा

SCROLL FOR NEXT