राज्यात येत्या काही दिवसांत विधानसभा निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुती-महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांनी त्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे. यासह आजी, माजी आणि भावी आमदारांनी आपल्यालाच तिकीट मिळावे यासाठी जोरदार फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे.
अशात लोकसभा निवडणुकीत राज्यात महत्त्वाचा ठरलेलेला मनोज जरांगे पाटील यांचा मराठा आरक्षणाचा मुद्दा यंदा विधानसभा निवडणुकीतही गेमचेंजर ठरेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
दरम्यान साम टीव्हीच्या प्रतिनिधीने जालना जिल्ह्यातील बदनापूर मतदार संघातील मतदारांशी चर्चा केली आहे. यामध्ये मतदारांंना मराठा आणि मनोज जरांगे पाटील फॅक्टरचा विधानसभा निवडणुकीत काय परिणाम होईल? असा प्रश्न विचारण्यात आला.
साम टीव्हीच्या प्रश्नाला उत्तर देताना एक मतदार म्हणाला, "मनोज जरांगे पाटील यांचा विधानसभा निवडणुकीतही नक्कीच इफेक्ट होईल. पण तो लोकसभा निवडणुकीत होता इतका नसेल. कारण लोकसभा व विधानसभा निवडणुकीची समिकरणे वेगवेगळी असतात. यासह या आंदोलनाची सुरुवातीला जी तीव्रता होती ती आता काहीशी मवाळ झाल्यासारखी वाटत आहे."
यावेळी उपस्थित मतदारांना विधानसभा निवडणुकीत बदनापूर मतदारसंघात बदल होणार का असे विचारले असता, एकजण म्हणाला, "यावेळी मतदारसंघात नक्की बदल होणार. विधानसभेत जरांगे पाटील फॅक्टर नक्कीच चालणार असे माझं वैय्यक्तिक मत आहे."
दरम्यान यावेळी उपस्थितांनी मतदारसंघातील पायभूत सुविधा आणि पाण्याच्या समस्येवरही मत व्यक्त केले. यासह काहीजण म्हणाले की, राज्यात विकास सोडून इतर सर्व गोष्टींचे राजकारण होत आहे.
राज्यातील मराठा आरक्षण आंदोलनाचा केंद्रबिंदू मराठवाडा होता. त्यामुळे सत्ताधारी महायुतीला याचा मोठा फटका बसला होता. संभाजीनगरमधून संदीपान भुमरे यांच्या रुपाने महायुतीला एकच जागा जिंकता आली होती. तर महाविकास आघाडीने वाकिच्या जागा जिंकल्या होत्या.
दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या मैदानात मनोज जरांगे पाटीलही उमेदवार उतरवणार आहेत. त्यामुळे याचा फटका सत्ताधाऱ्यांना बसणार की विरोधकांना बसणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.