raj thackeray amit thackeray eknath shinde esakal
Maharashtra Assembly Election 2024 News and voting updates

Amit Thackeray: एकनाथ शिंदेंचा त्याग; अमित ठाकरेंसाठी शिवसेना 'हा' मतदारसंघ सोडणार

Raj Thackeray: अमित ठाकरेंनी भांडूप मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवल्याची माहिती आहे. उमेदवारी दिली गेली तर अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. पण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मात्र अजूनही अमित ठाकरे यांच्या उमेदवारीबद्दल निर्णय घेतला नाही.

सकाळ डिजिटल टीम

Amit Thackeray News: राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे विधानसभेची निवडणूक लढवणार आहेत. त्यांच्यासाठी एकनाथ शिंदे हे मोठा त्याग करणार असून अमित ठाकरेंसाठी हक्काचा मतदारसंघ सोडणार असल्याची माहिती आहे.

अमित ठाकरेंसाठी एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतल्याची माहिती आहे. त्यांच्यासाठी शिवसेना भांडूपची जागा सोडायला तयार आहे. मनसे नेते अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असतील तर शिवसेना त्यांच्यासाठी जागा सोडणार आहे.

अमित ठाकरेंनी भांडूप मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवल्याची माहिती आहे. उमेदवारी दिली गेली तर अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. पण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मात्र अजूनही अमित ठाकरे यांच्या उमेदवारीबद्दल निर्णय घेतला नाही.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमित ठाकरे यांच्यासाठी भांडुपसोबत मागाठाणे आणि माहीम मतदारसंघांचीही चाचपणी सुरू आहे. या मतदारसंघांत मूळ शिवसेनेचे मात्र एकनाथ शिंदे गटात सहभागी झालेले अनुक्रमे प्रकाश सुर्वे आणि सदा सरवणकर आमदार आहेत, तर भांडुपमध्ये उद्धव ठाकरे गटाचे रमेश कोरगावकर आमदार आहेत. २०१९ मध्ये युवा सेनेचे प्रमुख आणि उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य वरळी मतदारसंघातून निवडणूक लढले.

त्यावेळेस मनसेने तेथे उमेदवार न देता आदित्य यांना अप्रत्यक्ष पाठिंबा दिला होता. यंदाच्या लढतीत अमित यांचे नाव भांडुपमधून जाहीर झाल्यास शिवसेना उद्धव ठाकरे गट काय भूमिका घेईल, याबाबत मतदारसंघात उत्सुकता आहे. भांडुपसाठी शिवसेना शिंदे गटही आग्रही असला तरी येथे माजी आमदार अशोक पाटील सोडल्यास पक्षाकडे अन्य उमेदवार नाही, तर भांडुपबाबत मनसेची भूमिका स्पष्ट होईपर्यंत भाजपने सावध भूमिका घेतल्याचे समजते.

भाजपकडून येथे माजी खासदार मनोज कोटक यांच्यासह दोन स्थानिक पदाधिकाऱ्यांची नावे चर्चेत आहेत. लोकसभा निवडणुकीत मनसेने दिलेला पाठिंबा लक्षात घेता अमित यांचे नाव येथून जाहीर झाल्यास भाजप हा मतदारसंघ सोडेल, असा स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांचं अनुमान आहे.

#ElectionWithSakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT