नांदेड: विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापण्यास सुरवात झाली आहे. दक्षिण मतदारसंघाची निर्मिती २००९ मध्ये झाली. तेव्हापासून झालेल्या तीनही निवडणुका चुरशीच्या आणि रंगतदार झाल्या आहेत. यंदाही अशीच परिस्थिती राहणार आहे.
महाविकास आणि महायुतीमधील एकूण सहाही पक्षातून दावेदारांची संख्या वाढली आहे. तसा हा मतदारसंघ हा शिवसेना- भाजपचा बालेकिल्ला होता. परंतु, मागील वेळेस या ठिकाणी काँग्रेसने यश मिळवले आहे.
नांदेड लोकसभा मतदारसंघात २००९ च्या निवडणुकीत काँग्रेसचे भास्करराव पाटील खतगावकर खासदार झाले. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत नांदेड दक्षिणमधून काँग्रेसचे ओमप्रकाश पोकर्णा आमदार झाले. २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत मोदी लाट असूनही काँग्रेसचे अशोक चव्हाण खासदार झाले. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे हेमंत पाटील आमदार आले.
त्यावेळी त्यांनी भाजपचे दिलीप कंदकुर्ते यांचा थोडक्यात पराभव केला. त्यामुळे दिलीप कंदकुर्ते यांचे आमदार होण्याचे स्वप्न अपुरे राहिले. या निवडणुकीत काँग्रेसची व्होट बॅंक मोठ्या प्रमाणात फुटली होती. निवडणुकीत एमआयएमने जोरदार लढत दिली होती. भाजपचे दिलीप कंदकुर्ते यांनी शिवसेनेला लढत देत दुसऱ्या स्थानावर राहिले होते. २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर खासदार झाले. त्यांनी काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा पराभव केला होता. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत नांदेड दक्षिणमध्ये जोरदार लढत झाली.
त्यात काँग्रेसचे मोहन हंबर्डे निवडून आले. या वेळेसही कंदकुर्ते यांना पराभव पत्करावा लागला. भाजप आणि शिवसेनेतील छुप्या संघर्षामुळे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना या निवडणुकीत तिसरे स्थान मिळाले होते. यावेळी एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीनेही जोरदार लढत दिली होती.
समीकरण बदलणार
आता सर्वच राजकीय समीकरण बदलले आहे. जरांगे फॅक्टरचा प्रभाव लोकसभेत जाणवला
आहे. मराठा आरक्षणाचा परिमाण लोकसभा निवडणुकीवर दिसून आला. यावेळी काँग्रेसकडून मोहन हंबर्डे, नांदेड दक्षिणची जागा शिवसेनेची असल्याने शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील हे निर्णय घेतील. त्यामुळे त्यांचे निकटवर्तीय शिवसेना शिंदे गटाकडून आनंद पाटील बोंढारकर उमेदवार ठरू शकतात. भाजपकडून डॉ. सचिन पाटील उमरेकर आणि दिलीप कंदकुर्ते हे परत
एकदा जागेवर हक्क सांगू शकतात. वंचितकडून फारुक अहमद यांचे नाव आहे. भाजपचे संजय पाटील घोगरे यांनी मतदारसंघ पिंजून काढला आहे. त्यामुळे ते पण दावेदार मानले जात आहेत. काँग्रेसचे अब्दुल सत्तार आदी इच्छुक आहेत.
#ElectionWithSakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.