Paithan Vidhan Sabha elections 2024 sakal
Maharashtra Assembly Election 2024 News and voting updates

Paithan Assembly Elections 2024: मानधनवाढीच्या निर्णयाचे सरपंच, उपसरपंचांकडून स्वागत !

Paithan Vidhan Sabha elections 2024: ग्रामपंचायतीची धुरा सांभाळणाऱ्या सरपंच व उपसरपंचांच्या मानधनात शासनाने दुप्पट वाढ केली.

सकाळ वृत्तसेवा

पैठण: ग्रामपंचायतीची धुरा सांभाळणाऱ्या सरपंच व उपसरपंचांच्या मानधनात शासनाने दुप्पट वाढ केली. आता सरपंचांना १० हजार रुपयांपर्यंत मानधन मिळणार आहे. याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाचे पैठण तालुक्यातील सरपंच व उपसरपंच यांनी स्वागत केले.

पैठण तालुक्यातील ११० पैकी २० ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंचांना हे मानधन प्रतिमहा मिळणार आहे. सरपंच व उपसरपंचांना अतिशय कमी मानधन दिले जात होते. त्यामुळे मानधनात वाढ करावी, अशी मागणी राज्यभरातील सरपंच संघटनांकडून केली जात होती. सरपंचाला महिन्याला दहा हजार, तर उपसरपंचाला चार हजार रुपये दिले जाणार आहेत.

दोन हजार लोकसंख्या असलेल्या गावाच्या सरपंचाला सहा हजार, तर उपसरपंचाला दोन हजार रुपये, दोन हजार ते आठ हजार लोकसंख्या असेल तेथील सरपंचाला आठ हजार, उपसरपंचाला तीन हजार रुपये व आठ हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असेल तेथील सरपंचाला १० हजार रुपये आणि उपसरपंचाला चार हजार रुपये मानधन दिले जाणार आहे.

गावाची जबाबदारी सांभाळणाऱ्या सरपंचांना कमी मानधन दिले जात होते. सरपंच, उपसरपंच यांच्या मानधनवाढीसाठी आम्ही सरपंच परिषदेच्या माध्यमातून राज्य शासनाकडे पाठपुरावा केला होता. राज्य शासनाने केलेल्या मानधनवाढीच्या निर्णयाचे स्वागत आहे.

: किशोर चौधरी, सरपंच, नवगाव-तुळजापूर ग्रुप ग्रामपंचायत, ता.पैठण.

#ElectionWithSakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Imtiaz Jaleel : बूथ कॅप्चर भाजपने केले अन् गुन्हा माझ्यावर कसा? इम्तियाज जलील

AUS vs IND 1st Test: भारतीय फलंदाजी ऑस्ट्रेलियन वेगवान माऱ्यासमोर कोलमडली! कसाबसा गाठला १५० धावांचा टप्पा

Nashik Vidhan Sabha Election : ‘महायुती-महाविकास’चे अपक्ष उमेदवारांवर लक्ष; वरिष्ठ नेत्यांकडून अपक्ष उमेदवारांशी संपर्क

Nanded Assembly Election 2024 : जातीय मतविभाजनाचा फटका कोणाला बसणार?

Uddhav Thackeray: निकालाची धडकी? उद्धव ठाकरेंचा प्लॅन बी! 'लाईव्ह'चं शस्त्र उगारलं, पुन्हा दगा टाळण्यासाठी उमेदवारांना एकत्र आणलं

SCROLL FOR NEXT