Harshvardhan-Patil-Indapur 
Maharashtra Assembly Election

Harshvardhan Patil: शरद पवार गटात जाण्याऐवजी... फडणवीसांनी हर्षवर्धन पाटलांना दिला होता पर्याय; ''पण वैयक्तिक प्रगतीपेक्षा...''

संतोष कानडे

Devendra Fadnavis: भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी भाजपला रामराम ठोकून शरद पवार गटाची वाट धरली आहे. शुक्रवारी त्यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली. सुरुवातीला पाटलांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधून शरद पवार गटात जाण्याबाबत विचारणा केली. कार्यकर्त्यांनी त्यांच्या मताला समर्थन दिलं.

शरद पवार गटात प्रवेश घेण्याचा निर्णय घेण्यापूर्वी आपण देवेंद्र फडणवीसांशी चर्चा केली असून त्यांनी आपल्याला दुसरा पर्याय दिला होता, अशी माहिती खुद्द हर्षवर्धन पाटलांनी दिली. मात्र त्यांनी तो मार्ग न स्वीकारता पक्षांतर करण्याचा निर्णय घेतला आहे.

पत्रकार परिषदेमध्ये बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले की, विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नेमकं आपण निर्णय काय घ्यायचा यासाठी मी मागच्या चार-पाच दिवासांपूर्वी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटायला गेलो. त्यावर त्यांनी माझ्यासमोर काही पर्याय ठेवले होते. मग मी माझी भूमिका मांडली.

हर्षवर्धन पाटलांनी पुढे सांगितलं की, शेवटी चर्चेअंती इंदापूरची जागा विद्यमान विधानसभा सदस्य लढवणार, हे निश्चित झालं. त्यामुळे मला शरद पवार गटाचा पर्याय असल्याचं मी सांगितलं. त्यावर फडणवीसांनी एक दुसरा पर्याय ठेवला. परंतु तो मर्याय मला अन् माझ्या कार्यकर्त्यांना मान्य नव्हता. माझ्या व्यक्तिगत प्रगतीपेक्षा मी जनतेचा विचार केला.

शरद पवारांची घेतली भेट

शरद पवारांशी झालेल्या भेटीबद्दल बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले, परवा मला शरद पवार साहेबांचा निरोप आला. सिल्व्हर ओकवर मला भेटायला बोलावलं. दीड तास सविस्तर चर्चा झाली. बैठकीला खासदार सुप्रियाताई सुळे उपस्थित होत्या. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचंही फोनवर बोलणं झालं.

''पवार साहेब म्हणाले, मी इंदापूर मतदारसंघाचा आढावा घेतला आहे. तुमच्याही कार्यकर्त्यांचा आग्रह असेल तर तुम्ही आमच्या पक्षात यावं. मी कार्यकर्त्यांना विचारलं काय करायरचं. तेव्हा कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात जाण्याचं सूचवलं. त्यामुळे आम्ही सर्वजणांनी शरद पवारांच्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे.'' असं शेवटी पाटील म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs SL मॅचमध्ये वाद, आधी आऊट, मग नॉट आऊट... रुमालामुळे निर्णयच बदलला! काय घडलं?

Gold Prices: लवकरच सोने 85 हजारांवर पोहचणार! गुंतवणूकदार होणार मालामाल; किती मिळणार रिटर्न?

Amitabh Bachchan : जेव्हा अमिताभ दिवसाला 200 सिगारेट्स ओढायचे आणि होतं या गोष्टीचं जबरदस्त व्यसन ; "मी तेव्हा हाताला..."

Cabinet Meeting : आता ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान करणे पडणार महागात! राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय

Vehicle Act: आता १६ वर्षीय सुद्धा दुचाकी चालवू शकतील! मोटार वाहन कायद्यात सुधारणा करण्याचा सरकारचा प्रस्ताव, वाचा सविस्तर...

SCROLL FOR NEXT