Maharashtra Assembly Election 2024 News and voting updates

BJP Maharashtra: महायुतीत भाजपला किती जागा मिळणार? अमित शाह यांनी मध्यरात्री घेतली महायुतीची बैठक Inside Story

Vidhansabha Election Latest News | चंद्रशेखर बावनकुळे यांनी योग्य ते बदल करण्याचे आश्वासन दिले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठा आंदोलन योग्य प्रकारे हाताळतील, असा विश्वास अमित शहा यांनी व्यक्त केला आहे

मृणालिनी नानिवडेकर ः सकाळ न्यूज नेटवर्क

Latest Maharasthra News: लोकसभा निवडणुकीतील अपयशामुळे नैराश्यात असलेल्या कार्यकर्त्यांना लढण्याचे बळ देतानाच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजप १५० ते १६० विधानसभा मतदारसंघात चांगल्या स्थितीत असल्याचे महायुतीतील मित्रपक्षांना सांगितले आहे.

मंगळवारी रात्री उशिरा झालेल्या बैठकीत शहा यांनी २८८ पैकी कोणत्याही मतदारसंघात भाजप शिंदे गट किंवा अजित पवार गटाच्या उमेदवारांबद्दल कोणताही भेदभाव करणार नाही, असे आश्वासनही दिले. या दोन्ही पक्षांना त्यांचे आमदार असलेल्या मतदारसंघांत जागा देण्यात येईल

पण अन्य ठिकाणच्या वातावरणाचा अंदाज घेऊनच जागावाटप होईल, असे भाजपने स्पष्ट केले आहे. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार अमित शहा यांचे सूत्र लक्षात घेत महाराष्ट्रात अत्यंत लोकप्रिय असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांच्या पक्षासाठी कोणताही आग्रह धरलेला नाही. अन्य मतदारसंघात ज्याची ताकद, त्यालाच संधी असे सूत्र स्वीकारण्यास तिघांनीही संमती दिली असल्याचेही समजते. सत्ता येणे महत्त्वाचे आहे, पक्षाचा अभिमान जपणे नव्हे यावरही तिघांचेही एकमत

झाले आहे. मराठा समाजाचे आंदोलन तीव्र झाल्याचे चित्र पसरले असले तरी या समाजातील काही मते आपल्याला मिळतील, असा विश्वास महायुतीला आहे, असे एका नेत्याने सांगितले.

भाजपने ओबीसी समाजाची मोट बांधली असून त्यामुळे मतसंख्येत लक्षणीय वाढ होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे विविध पाहण्यांतून स्पष्ट झाले आहे. त्यांची प्रतिमा लक्षात घेता त्यांना यश मिळेल पण पक्षात यंत्रणा तयार व्हावी, यासाठी काही दिवस लागतील.

सध्या शिंदे गटाचा जोर ६० ते ६५ विधानसभा मतदारसंघांत दिसतो, अशी चर्चाही झाली. अजित पवार गटही ५० जागांची मागणी करत असला तरी त्यांनी ४० फार तर ४५ मतदारसंघ मागावेत, असे मत व्यक्त केले आहे, असे सांगण्यात आले आहे. अजित पवार गटाने केलेल्या पाहणीत २२ मतदारसंघ ते जिंकतील पण १४ मतदारसंघांत त्यांच्या उमेदवारांना जिंकण्यासाठी मित्रपक्षांची लागणार आहे. मदत

भाजपच्या अंतर्गत बैठकीत बाहेरच्या राज्यातून आलेल्या प्रवासी कार्यकर्त्यांनी जनतेत भाजपला निवडून देण्याची इच्छा आहे पण भाजपची यंत्रणा त्यांच्याशी संपर्क साधण्यात कमी पडत असल्याची तक्रारवजा खंत व्यक्त केली.

हे कार्यकर्ते बडे नेते आहेत. त्यांच्या माहितीची दखल घेत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी योग्य ते बदल करण्याचे आश्वासन दिले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठा आंदोलन योग्य प्रकारे हाताळतील, असा विश्वास अमित शहा यांनी व्यक्त केला आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Vidhan Sabha Election: मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर जिल्ह्यात विक्रमी मतदान; 2009 च्या निवडणुकीत 60 टक्के, तर यंदा 69.12 टक्क्यांवर

आलिया कपडे बदलत असताना तो सतत तिच्यावर... इम्तियाज अली यांनी सांगितली ती घटना; म्हणाले- त्याला मी पाहिलं तेव्हा

Sangli MIDC Fire : सांगली एमआयडीसीतील केमिकल कंपनीत वायू गळती; दोघांचा मृत्यू, 10 जणांची अवस्था गंभीर

Nashik Police : मतमोजणी केंद्राभोवती कडेकोट सुरक्षा तैनात; सशस्त्र आयटीबीपीची करडी नजर

IPL Schedule: क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर! पुढील 3 हंगामाच्या तारखा BCCI ने केल्या जाहीर

SCROLL FOR NEXT