Ghansawangi Vidhan Sabha elections 2024 sakal
Maharashtra Assembly Election

Assembly Elections 2024: निवडणूक जाहीर झाल्यानंतरच चित्र होणार स्पष्ट !

Ghansawangi Vidhan Sabha elections 2024: घनसावंगी मतदारसंघ उमेदवारी न मिळाल्यास अनेक जण मारणार इकडून तिकडे उड्या ?

सुभाष बिडे

घनसावंगी: विधानसभेच्या उमेदवारीसाठी मोठी चुरस आहे. इच्छुकांची संख्या मोठी असल्याने उमेदवारी न मिळाल्यास अनेक जण इकडून तिकडे उड्या मारणार आहेत. त्यामुळे कोण उमेदवार कोणत्या पक्षाकडून लढणार हे निवडणूक जाहीर झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

मात्र,आजघडीला निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय वातावरण चांगलेच तापत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, इच्छुकांनी मतदारसंघात गाठीभेटी व संवाद साधण्यावर भर दिला आहे.

घनसावंगी मतदारसंघात मागील निवडणुकीत आमदार राजेश टोपे यांना अवघ्या ३४०० मतांनी विजय मिळाला होता. त्यांना शिवसेनेचे डॉ. हिकमत उढाण यांनी कडवी झुंज दिली होती. यंदाच्या निवडणुकीत व राज्यात नव्याने अस्तित्वात आलेल्या समीकरणात आमदार राजेश टोपे हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाकडून म्हणजेच महाविकास आघाडीकडून निवडणूक लढविणार आहेत.

त्यांच्या विरोधात महायुतीत भाजपचे सतीश घाटगे हे उमेदवारीच्या स्पर्धेत आघाडीवर आहेत. तर, दुसरीकडे महाविकास आघाडी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे डॉ. हिकमत उढाण हे निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. त्यांचा इतर पक्षात प्रवेशाच्या वावड्या उडत आहेत. मात्र, अद्याप कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढविणार हे निश्‍चित नाही. माजी विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड, पंडित भुतेकर हे शिंदे गटाकडून निवडणूक लढविण्यासंबंधी हालचाली करीत आहेत.

माजी आमदार शिवाजी चोथे यांच्यासह अपक्षांचा मोठा भरणा या निवडणुकीत असणार आहे. तसेच, माजी आमदार विलासराव खरात यांची या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका असणार आहे. एकंदरीत घनसावंगी विधानसभा मतदारसंघात जातीय समीकरणांवर ही निवडणूक असणार आहे. मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे गाव व आंदोलनाचे ठिकाण याच मतदारसंघात आहे.

त्यांची भूमिका या निवडणुकीत निर्णायक राहणार असून, त्यांच्याकडून उमेदवार जाहीर होतो की, त्यांचा कोणाला पाठिंबा मिळतो. तसेच, ओबीसी मतदार कोणाला स्वीकारतो. यावर या निवडणुकीची समीकरणे असणार आहेत. महायुतीत उमेदवारांची संख्या पाहता विधानसभेच्या निवडणुकीसाठी इच्छुकांची संख्या अधिक आहे, त्या दृष्टीने सर्वांनी अनेक दिवसांपासून तयारी देखील सुरू केली आहे.

या सर्वच नेत्यांच्या दावेदारीमुळे उमेदवारांची निवड करताना महायुती कोणता निर्णय घेणार आणि तो घेताना कोणते समीकरण विचारात घेते. याकडे राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे. उमेदवारांची संख्या पाहता निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारी न मिळाल्यास कोणता उमेदवार कोणता झेंडा घेऊन निवडणूक लढवितो हे आगामी काळात दिसणार आहे.

तर्क-वितर्कांवर झडताहेत चर्चा...

दुसरीकडे आमदार राजेश टोपे हे या मतदारसंघातून सहाव्यांदा बाजी मारतात का, तसेच त्यांना विजयापासून कोण रोखणार यावर अनेक तर्क-वितर्क, राजकीय समीकरणे, जातीय समीकरण, विकासांचा मुद्दा, सरकारच्या योजनांचा फायदा यावर चर्चा रंगत आहेत. घनसावंगी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर श्रेयवादावरून नेत्यांच्या समर्थकांत वाद उफाळून येत आहे. नेते एकमेकांना लक्ष्य करून बोलत असल्याने कार्यकर्तेही आपापल्या नेत्यांची बाजू मांडत आहेत.

#ElectionWithSakal

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT