Loha Vidhan Sabha elections 2024 sakal
Maharashtra Election 2024 Result Vote Counting

Loha Assembly Elections 2024: काँग्रेसचे प्रदेश सचिव प्रकाश आष्टे यांच्या नियुक्तीला स्थगिती; काँग्रेस पक्षातील वाद चव्हाट्यावर !

Loha Vidhan Sabha elections 2024 : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या सचिवपदी प्रकाश आष्टे यांची निवड झाल्यानंतर पक्षांतर्गत कुरघोडीच्या राजकारणाला सुरवात झाली आहे.

अविनाश काळे

उमरगा: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या सचिवपदी प्रकाश आष्टे यांची निवड झाल्यानंतर पक्षांतर्गत कुरघोडीच्या राजकारणाला सुरवात झाली आहे. आष्टे यांच्या नियुक्तीला तातडीने आव्हान दिल्याने स्थगिती देण्यात आली असून, स्थगितीचे पत्र सोमवारी (ता. सात) सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने काँग्रेसमध्ये सुरू असलेला वाद उफाळून आला आहे.

दरम्यान, काँग्रेस पक्षातील वाद हा नवा नाही, त्याला पूर्व इतिहासाची झालर आहे.

उमरगा, लोहारा तालुक्यात काँग्रेस पक्षाच्या विचारधारेला मानणारा सर्व जाती, धर्मातील मोठा वर्ग आहे. फुलचंद गांधी, विश्वंभरराव हराळकर यांनी प्रत्येकी एक टर्म, भास्करराव चालुक्य तीन टर्म, खालेकमियाँ काझी दोन टर्म हे दिवंगत लोकप्रतिनिधी व बसवराज पाटील एक टर्म काँग्रेसचे आमदार होते. विजयसिंह चालुक्य शेकापचे तर राजारामबापू पाटील व भाऊसाहेब बिराजदार एस काँग्रेसकडून निवडून आले होते. १९९५ नंतर मात्र काँग्रेसला धक्के बसत गेले.

तरीही एक टर्म बसवराज पाटील यांनी मोठ्या संघर्षातून यश मिळवले होते. शिवसेनेचे प्रा. रवींद्र गायकवाड दोन वेळा, तर, सलग तीन टर्म ज्ञानराज चौगुले मतदारसंघाचे नेतृत्व करताहेत. बसवराज पाटील यांनी सहकार, स्थानिक स्वराज्य संस्थेवर मजबूत पकड ठेवली होती.

कुरघोडीचा इतिहास

काँग्रेसमध्ये अंतर्गत कुरघोडीचा वाद नवा नाही. दिवंगत आमदार खालेकमियाँ काझी यांच्या कार्यकाळात सुरेश पाटील तालुकाध्यक्ष होते. वरिष्ठ पातळीवरून शिवाजीराव चालुक्य यांची तालुकाध्यक्ष म्हणून निवड झाली. कालांतराने अंतर्गत कुरघोडीतून अशोकराव जवळगे तालुकाध्यक्ष झाले होते. मात्र, त्यांचे पद क्षणिक ठरले, त्यांच्या सत्कार कार्यक्रमातच पद रद्द झाल्याचे पत्र प्राप्त झाले होते.

दिवंगत चालुक्य भाजपमध्ये गेल्यानंतर काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदाच्या निवडीची धुरा बसवराज पाटील यांच्याकडेच राहिली होती. दरम्यान, पाटील लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये गेल्याने चित्र पालटले; मात्र काही निष्ठावंत कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्येच राहण्याचा निर्णय घेतला.

आष्टे यांच्या नियुक्तीला स्थगिती !

माजी मंत्री बसवराज पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांचे समर्थक असलेले काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश आष्टे, प्रदेश सचिव दिलीप भालेराव यांनी पद शाबूत ठेवण्याची खेळी केली. लोकसभा निवडणुकीत दोघेही महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारसभेच्या व्यासपीठावर होते. पाटील भाजपमध्ये गेल्यानंतर काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी निष्ठावंत कार्यकर्त्यांची फळी तयार होत होती. पाटील यांचे विरोधक असलेले लातूरचे आमदार अमित देशमुख यांचे बळ मिळत होते.

काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विजयकुमार सोनवणे, नानाराव भोसले, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अश्लेष मोरे, राष्ट्रीय समन्वयक महेश देशमुख, मधुकर यादव, विजय वाघमारे आदी कार्यकर्त्यांनी पक्षाला बळ देण्यासाठी कार्यक्रम घेतले. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आष्टे यांची प्रदेश सचिवपदी निवड झाल्यानंतर काँग्रेसमधील वाद उफाळून आला आहे, तो स्थगिती मिळवण्यापर्यंत गेला आहे. यापुढे तो कुठपर्यंत जातो, हे पाहावे लागेल.

पक्षश्रेष्ठींनी प्रकाश आष्टे यांची प्रदेश सचिवपदी निवड केली होती. त्या निवडीला पक्षश्रेष्ठींनी स्थगिती देण्यात आली आहे, त्यांची निवड करताना आणि स्थगिती देतानाही पक्षश्रेष्ठींनी आपणास विचारणा केली नव्हती. त्यामुळे या मागचे कारण सांगता येणार नाही.

: ॲड. धीरज पाटील, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस

#ElectionWithSakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित तू थोडक्यात वाचलास.. वाकून नमस्कार करणाऱ्या रोहित पवारांना अजित दादांचा मिश्किल टोला

दाऊदने मला जीवे मारण्याची धमकी दिली, म्हणून...; Lalit Modi यांचा धक्कादायक खुलासा; म्हणाले, शाहरुख खान...

TRAI New Rules : मोठी बातमी! 1 डिसेंबरपासून OTP बंद होणार? ग्राहकांचा फायदा की नुकसान, नेमकं प्रकरण वाचा

Share Market Opening: शेअर बाजारात मोठी वाढ; निफ्टी 24,200च्या पार, सेन्सेक्स 1300 अंकांनी वर, कोणते शेअर चमकले?

Latest Maharashtra News Updates : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगदा १५ दिवसांसाठी राहणार बंद

SCROLL FOR NEXT