Kaatol Assembly Constituency esakal
Maharashtra Assembly Election

Katol Assembly Election 2024: काटोल विधानसभा मतदारसंघ देशमुखांचाच?, पण कोणत्या?

सकाळ वृत्तसेवा

नागपूर: काटोल मतदारसंघात सरपंच पदापासून राजकारणाची सुरुवात करणारे अनिल देशमुख हे मंत्रीपदापर्यंत पोहोचले. त्यांना शह देण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. शेवटी त्यांच्या पुतण्याने २०१४ मध्ये त्यांच्यावर विजय मिळविला. मात्र, या निवडणुकीत अनिल देशमुख विरुद्ध आशीष देशमुख असा सामना रंगणार का?, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

काटोल-नरखेड विधानसभा मतदारसंघावर गेल्या अनेक वर्षांपासून देशमुख घराण्याची सत्ता आहे. रणजित देशमुख, अनिल देशमुखनंतर आशीष देशमुख यांच्या वर्चस्व राहिले आहे. देशमुख घराण्याव्यतिरिक्त अनेकांनी येथे नशीब अजमावले. पण त्यांच्या पदरी निराशाच पडली.

महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर लाच प्रकरणाचा आरोप ठेवून त्यांच्यावर ईडीची कारवाई झाली. दोन वर्षे तुरुंगांत होते. त्यानंतर त्यांच्या मतदारसंघात त्यांचा मुलगा सलिल देशमुख यांनी काम सांभाळले. चुकीच्या पद्धतीने सूडबुद्धीने कारवाई केल्याची सहानुभूती त्यांना मिळत आहे. त्यामुळे त्यांना विजय जड जाईल, असे वाटत नाही.

राष्ट्रवादी कॉग्रेसचे उमेदवार म्हणून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल. राष्ट्रवादी शरद पवार या गटाचे ते आमदार आहेत. सध्या अजित दादा पवार यांनीही यावर दावा केला आहे. सुबोध मोहिते मतदारसंघात फिरत आहेत. मात्र, हा मतदारसंघ भाजप सोडणार नाही, असे दिसून येत आहे.

भाजपकडून आशीष देशमुख, चरणसिंग ठाकूर यांची वर्णी लागू शकते. कुणबी, तेली समाजाचे येथे प्राबल्य आहे. बौद्ध, मागासवर्गीयांचेही येथे मताधिक्य आहे. मात्र, अनिल देशमुख यांना मिळणारी सहानुभूती अधिक आहे.

काटोल मतदारसंघ

  • कुणबी, तेली समाजाचे प्राबल्य

  • बौद्ध, मागासवर्गीयांचे मतांवर डोळा

  • मतदारसंघाच्या विकासावर चर्चा

  • अनेक समस्यांमुळे जनता त्रस्त

  • संत्रा उत्पादक शेतकऱ्यांकडे डोळेझाक

  • विरोधक मात्र, निवडणुकीपुरते असल्याचा आरोप

#Elecationwithsakal

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Elections 2024: मोठी बातमी; 'मविआ'चा जागा वाटपाचा तिढा सुटला, काँग्रेस ठरला 'मोठा भाऊ'

Maharashtra Election: महायुती सरकारनं काढलेला SC-ST उपवर्गिकरणासंबंधीचा जीआर रद्द होणार? राज्य निवडणूक अधिकाऱ्यांचे संकेत

IPL 2025 News : दिल्ली कॅपिटल्स फक्त ३ खेळाडूंना रिटेन करणार, नावं समजली; कोचच्या पदासाठी भारताचा माजी फलंदाज आघाडीवर

Latest Maharashtra News Updates : वाघोली, खराडी भागात पावसाला सुरुवात

Buldhana Assembly Election 2024 : दिवाळीच्या थंडीत राजकारण तापणार! फटाके कोण फोडणार आणि कुणाला लागणार याचीच सर्वत्र चर्चा

SCROLL FOR NEXT