solapur sakal
Maharashtra Assembly Election 2024 News and voting updates

मतदानासाठी शेवटचे १५ मिनिटे शिल्लक! सोलापूर जिल्ह्यात ५७.०९ टक्के मतदान; दक्षिण सोलापूर, शहर मध्य व शहर उत्तर या ३ मतदारसंघात सर्वात कमी मतदान

जिल्ह्यातील ११ लाख ३० हजार ९०६ पुरुष मतदारांनी (५७.३५ टक्के) तर १० लाख ६६ हजार २६२ महिला (५६.८१ टक्के) मतदारांनी सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावला आहे. तृतीपंथीय ३१० पैकी ६९ जणांनीच मतदान केले आहे. आता मतदानासाठी केवळ १५ मिनिटांचा अवधी शिल्लक आहे. सायंकाळी ६ पूर्वी रांगेत उभारलेल्या मतदारांचे मतदान होईपर्यंतच प्रक्रिया सुरु राहणार आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : जिल्ह्यातील ११ लाख ३० हजार ९०६ पुरुष मतदारांनी (५७.३५ टक्के) तर १० लाख ६६ हजार २६२ महिला (५६.८१ टक्के) मतदारांनी सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावला आहे. तृतीपंथीय ३१० पैकी ६९ जणांनीच मतदान केले आहे. आता मतदानासाठी केवळ १५ मिनिटांचा अवधी शिल्लक आहे. सायंकाळी ६ पूर्वी रांगेत उभारलेल्या मतदारांचे मतदान होईपर्यंतच प्रक्रिया सुरु राहणार आहे.

जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघांपैकी बार्शी, शहर उत्तर, दक्षिण सोलापूर, शहर मध्य, पंढरपूर, अक्कलकोट व सांगोला या ठिकाणी पुरुषांच्या बरोबरीने मतदान केलेल्या महिलांचेही मतदान तेवढेच आहे. दरम्यान, जिल्ह्यात १९ लाख ७१ हजार ८३१ पुरुष मतदार असून दुसरीकडे १८ लाख ७६ हजार ७२८ महिला मतदार आहेत. अजूनही जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघातील ३८ लाख ४८ हजार ८६९ मतदारांपैकी १६ लाख ५१ हजार ६३३ मतदारांनी मतदानाचा अजून हक्क बजावलेला नाही. सोलापूर जिल्ह्यातील मतदानाची सायंकाळी पाच वाजेपर्यंतची टक्केवारी ५७.०९ टक्के होती. आतापर्यंत जिल्ह्यात शांततेत मतदान सुरु आहे. पोलिस प्रमुखांचेही मतदानावर लक्ष आहे.

मतदारसंघ एकूण मतदान झालेले मतदान टक्केवारी

  • करमाळा ३,२८,९९४ १,९४,०१० ५८.९७

  • माढा ३,५२,६९१ २,०४,५४१ ५७.९९

  • बार्शी ३,३७,४९९ २,१०,८६० ६२.४८

  • मोहोळ ३,३१,४५८ १,९८,३३८ ५९.८४

  • शहर उत्तर ३,२८,५७२ १,६८,२२९ ५१.२०

  • शहर मध्य ३,४६,६७७ १,७१,९३७ ४९.६०

  • अक्कलकोट ३,८३,४७९ २,२४,२६२ ५८.४८

  • दक्षिण सोलापूर ३,८२,७५४ १,९८,७९० ५१.९४

  • पंढरपूर ३,७३,६८४ २,०२,४४६ ५४.१८

  • सांगोला ३,३३,४९३ २,१४,४२३ ६४.३०

  • माळशिरस ३,४९,५६८ २,०९,४०० ५९.९०

  • एकूण ३८,४८,८६९ २१,९७,२३६ ५७.०९

मतदानाची टक्केवारी अशी...

  • सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत : ५.१६ टक्के

  • सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत : १५.६६ टक्के

  • सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत : २९.४४ टक्के

  • सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत : ४३.४९ टक्के

  • सकाळी ७ ते सायंकाळी ५ पर्यंत : ५७.०९ टक्के

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virat Kohli Bat: ऑस्ट्रेलियात विराटची क्रेझ! विराटची बॅट खरेदी करायची असेल तर मोजावे लागतील चक्क १ लाख ६५ हजार रुपये

Amravati Assembly Election 2024: दुचाकीवरुन नेल्या ईव्हीएम मशीन; अमरावतीच्या गोपाल नगरमध्ये राडा

Nagpur Crime : धक्कादायक! नागपुरात मतदानानंतर ईव्हीएम घेऊन जाणा-या गाडीची जमावाने केली तोडफोड

Worli Vidhan Sabha Voting: शेवटच्या एका तासात मुख्यमंत्र्यांनी आदित्य ठाकरेंचं टेन्शन वाढवलं; ठाण्याकडे निघालेला दौरा वरळीकडे वळला...

Vikramgad Assembly constituency Voting : मोखाड्यात मतदान यंत्राची संथ गती, सुर्यमाळ मध्ये रात्री ऊशीरा पर्यंत मतदान 

SCROLL FOR NEXT