devendra fadnavis news esakal
Maharashtra Assembly Election

BJP Strategy : विधानसभेसाठी भाजपचं ठरलं! 150 पेक्षा जास्त जागा लढवणार? लोकसभा निकाल अन् सर्वेक्षण अहवालाचा घेणार आधार

Maharashtra Assembly Elections 2024: भाजपाच्या विभागनिहाय मॅराथॉन बैठका घेतल्या जात आहेत. कोअर कमिटीच्या बैठकीनंतर भाजपाच्या महामंत्र्यासोबत भूपेंद्र यादव यांची तातडीची बैठक होणार आहे.

Sandip Kapde

आगामी विधानसभेसाठी महाराष्ट्रात भाजपाने १५० पेक्षा जास्त जागा लढवाव्यात असे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचे मत आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना विधानसभा निहाय मिळालेली मते आणि गेल्या विधानसभेत मिळालेली मते, तसेच सर्वेक्षण अहवालाच्या आधारे विधानसभा निहाय उमेदवार निवडले जाणार आहेत. 

देवेंद्र फडणवीस यांना विशेष अधिकार-

गेल्या निवडणुकीमध्ये ज्या पक्षाने ज्या जागा जिंकल्या, त्या जागा त्याच पक्षाकडे राहतील, मात्र काही मोजक्या जागांमध्ये फेरबदल होण्याची शक्यता आहे. जिंकून येण्याची खात्री असलेला उमेदवार महायुतीतील कोणत्या पक्षाकडे आहे याबाबत लोकसभा निकाल आणि सर्वेक्षण अहवालाचा आधार घेतला जाणार आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जागा निश्चितीचा अधिकार कोअर कमिटीच्या बैठकीत देण्यात आला आहे.

कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा-

कोअर कमिटीच्या बैठकीत जागा वाटप आणि विधानसभेची रणनीती यावर चर्चा झाली. भाजपाचे प्रभारी भूपेंद्र यादव विधानसभा निवडणुकीसाठी अॅक्शन मोडवर आहेत. भाजपाच्या विभागनिहाय मॅराथॉन बैठका घेतल्या जात आहेत. कोअर कमिटीच्या बैठकीनंतर भाजपाच्या महामंत्र्यासोबत भूपेंद्र यादव यांची तातडीची बैठक होणार आहे.

महत्त्वपूर्ण बैठक-

या बैठकीत प्रभारी भूपेंद्र यादव, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, महामंत्री संजय केनेकर, विजय चौधरी, विक्रांत पाटील, माधवी नाईक, चित्रा वाघ आणि श्रीकांत भारतीय उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत प्रामुख्याने महाराष्ट्रातील पाच महामंत्र्यांकडून विभागीय संघटनात्मक आढावा घेतला जाणार आहे. तसेच, अमित शहा १६, १७, १८ तारखेला महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहेत. यासंदर्भात देखील नियोजनाचा आढावा घेतला जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Govt of India: भारत सरकारने विकिपीडियाला बजावली नोटीस, केला 'हा' गंभीर आरोप

IPL Auction 2025: CSK vs MI यांच्यात पाच खेळाडूंसाठी रंगणार वॉर! दोन्ही संघ मागे नाही हटणार

Share Market Closing: शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक! सेन्सेक्स 700 अंकांनी वाढला; निफ्टी 24,200च्या जवळ

CJI DY Chandrachud : सरकारविरोधात निकाल म्हणजेच न्यायव्यवस्थेचे स्वतंत्र असे नाही; सरन्यायाधीशांचे खडे बोल

Latest Marathi News Updates live : इतरांकडे असलेल्या चांगल्या गोष्टी पंतप्रधानांना दिसत नाहीत- खर्गे

SCROLL FOR NEXT