Ajit Pawar sakal
Maharashtra Assembly Election

Ajit Pawar: 'लाडक्या बहीणी' विधानसभेत देणार का अजितदादांना आशीर्वाद? सर्व्हेत मोठी माहिती समोर

Sandip Kapde

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात दोन मोठे सर्वेक्षण केले आहेत. यातील पहिल्या सर्व्हेच्या निष्कर्षांमध्ये पक्षासाठी काहीसे नकारात्मक चित्र समोर आले होते. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला केवळ एकच जागा मिळाल्याने हा निराशाजनक परिणाम दिसून आला. परंतु, ‘लाडकी बहीण’ या महत्त्वाकांक्षी योजनेनंतर पक्षाला राज्यभरात चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे नव्या सर्व्हेतून समोर आले आहे.

लाडकी बहीण’ योजनेचा लाभ राज्यातील अनेक महिलांना मिळत आहे, ज्यामुळे महिलांमध्ये राष्ट्रवादीबद्दल सकारात्मक भावना निर्माण झाल्या आहेत. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील या योजनेच्या अंमलबजावणीने पक्षाची प्रतिमा सुधारणे हे या सर्व्हेचे प्रमुख निष्कर्ष आहेत. राज्यातील महिलांमधील या सकारात्मक भावना पक्षाच्या आगामी विधानसभा निवडणुकीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सध्या शरद पवार आणि त्यांच्या कार्यावर टीका टाळण्याचे धोरण अवलंबले आहे. शिवाय, महायुतीमध्ये राष्ट्रवादी घेत असलेल्या भूमिकांमुळेही पक्षाच्या प्रति जनतेचा दृष्टिकोन बदलत आहे. सर्व्हेत असे नमूद करण्यात आले आहे की, योजनांचा प्रसार आणि महायुतीतील राष्ट्रवादीची भूमिका यामुळे पक्षाविषयी सकारात्मक भावना पसरली आहे.

राज्यातील सर्व आमदारांचे स्थानिक पातळीवरील कामकाज, लोकांमधील प्रतिमा, आणि मतदारसंघातील भूमिका यावर आधारित उमेदवारी जाहीर करण्याचा विचार पक्षाकडून केला जात आहे. पुढील महिन्यात आणखी एका सर्वेक्षणाद्वारे या मुद्यांचे सखोल विश्लेषण करण्यात येणार आहे. यावर आधारितच पक्षाच्या विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांची यादी अंतिम करण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cabinet Meeting : कोतवालांच्या मानधनात १० टक्के वाढ ते राज्यात विशेष शिक्षक पदाची निर्मिती; मंत्रमंडळाच्या बैठकीत झाले 'हे' महत्वाचे निर्णय

Gold Rate: सोने वर्षाच्या अखेरीस 1,00,000 रुपयांच्यावर जाणार; ग्लोबल ब्रोकरेज फर्मने वर्तवला अंदाज

IAS अधिकाऱ्याच्या पत्नीवर गन पॉईंटवर बलात्कार, आरोपींचा जामीन रद्द! कोर्टाने पोलिसांना फटकारले

Purandar Airport: पुरंदर विमानतळासाठी कधी सुरू होणार भूसंपादन? उद्योगमंत्र्यांनी नेमकं काय सांगितले?

Latest Maharashtra News Updates : भारतीय पोलीस सेवा ७६ RR च्या प्रोबेशनर्सनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेतली भेट

SCROLL FOR NEXT