MVA ESakal
Maharashtra Assembly Election

Assembly Elections 2024: मोठी बातमी; 'मविआ'चा जागा वाटपाचा तिढा सुटला, काँग्रेस ठरला 'मोठा भाऊ'

Vrushal Karmarkar

निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर केली आहे. राज्यातील 288 जागांसाठी 20 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. या घोषणेने राज्यातील राजकीय तापमान चांगलेच तापले आहे. राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. महाविकास आघाडीत 222 जागांवर एकमत झाले आहे. तिन्ही पक्ष सध्या या जागांवर उमेदवार निवडीची प्रक्रिया पुढे नेणार आहे. अशात कॉंग्रेसच्या गोटातून एक माहिती समोर आली आहे.

आज काँग्रेस स्क्रिनिंग कमिटीची बैठक होणार आहे. या बैठकीत 84 जागांवर चर्चा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. आतापर्यंत महाविकास आघाडीच्या 222 जागांवर चर्चा झाली आहे. या चर्चेत काँग्रेसला 84 जागा सुटल्या आहेत. तसेच बाकी राहिलेल्या जागांमधून आणखी काँग्रेसला जागा मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 20 ऑक्टोबरला काँग्रेसच्या CEC बैठकीत या जागांवर शिक्कामोर्तब होणार आहे.

महाराष्ट्रात महाविकास आघाडीला पाठिंब्याची लाट असल्याचा काँग्रेसचा दावा आहे. राज्याला एनडीएपासून वाचवण्याचा अजेंडा घेऊन एमव्हीए निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे नेते नसीम खान म्हणाले की, काँग्रेसकडे सर्व जागांवर तगडे उमेदवार आहेत. लवकरच उमेदवारांची यादी काँग्रेस निवडणूक समितीकडे पाठवली जाणार आहे.

निवडणुकीच्या तारखांच्या घोषणेवर विरोधकांनीही प्रतिक्रिया दिली आहे. विधानसभा निवडणूक प्रक्रिया ३५ दिवसांत पूर्ण करण्याची घोषणा निवडणूक आयोगाने केली असल्याचे विरोधकांनी सांगितले. उत्तर प्रदेश नंतर महाराष्ट्र विधानसभा सर्वात मोठी आहे. असे असतानाही एकाच टप्प्यात निवडणुका होत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nanded Bye Poll: नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून ‘या’ नावावर एकमत! पक्षाच्या स्क्रिनिंग कमिटीच्या बैठकीत काय झाली चर्चा?

Sports Bulletin 15th October 2024: ICC हॉल ऑफ फेमध्ये तीन दिग्गजांचा समावेश ते भारत-न्यूझीलंड कसोटीच्या वेळेत बदल

Justice Idol: कायदा आता आंधळा नाही! न्यायदेवतेच्या मूर्तीमध्ये बदल; डोळ्यांवरील पट्टी हटवली अन्..., सरन्यायाधिशांचा मोठा निर्णय

Shyam Manav: श्याम मानव यांच्या ‘संविधान बचाव, महाराष्ट्र बचाव’ सभेत भाजयुमोच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ

Latest Maharashtra News Updates : बीएमसीने 17-18 ऑक्टोबर रोजी मुंबईत 5-10 टक्के पाणीकपात जाहीर केली

SCROLL FOR NEXT