Raj Thackeray esakal
Maharashtra Assembly Election

Raj Thackeray यांच्या बैठकींचा धडाका! पुण्यातील 'या' ८ मतदारसंघात शिलेदार ठरले

Vrushal Karmarkar

Maharashtra Assembly Election: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागावाटपाचा तिढा कायम दिसून येत आहे. यातच भाजपने त्यांच्या पहिल्या ९९ जागांवर उमेदवार घोषित केले आहे. तर दुसरीकडे स्वबळावर लढणारा मनसे पक्षानेही निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे बैठका घेत आहेत. आज राज ठाकरेंनी बैठक घेतली. या बैठकीसाठी अनेक मनसे नेते उपस्थित होते.

सलग दोन दिवस पुण्यातील नेत्यांशी राज ठाकरेंनी चर्चा केली आहे. मुंबईत राज ठाकरे यांच्या सोबतची पुण्यातील मनसे नेत्यांची आजची बैठक संपली आहे. पुणे शहरासह जिल्ह्यातील सर्व जागा लढण्याची मनसेची तयारी दर्शवली आहे. राज ठाकरेंनी सर्व नेत्यांना निवडणूक लढवण्याच्या आणि उमेदवारांना जिंकवून आणण्याच्या सूचना दिल्या आहे. आजच्या बैठकीत पुणे शहरातील आठ ही मतदारसंघ आणि जिल्ह्यातील उमेदवार जवळपास निश्चित झाल्याचे समोर आले आहे. तसेच पुढील 48 तासांच्या आत मनसेचे उमेदवार घोषित होणार असल्याची शक्यता आहे.

कसबा, शिवाजीनगर, हडपसर यासह इतर मतदारसंघात उमेदवारांची नावे जवळपास निश्चित झाली आहेत. राज ठाकरे लवकरच या उमेदवारांची नावे घोषित करणार आहे. तर दुसरीकडे मविआमधील जागांचा तिढा काय सुटण्याचं नाव घेत नाही आहे. ठाकरे गट आणि कॉंग्रेसमध्ये जागांवरून मतभेद सुरू असल्याच्या चर्चा होत आहे. तर महायुतीत भाजपनंतर आता दोन्ही मित्रपक्ष त्यांच्या उमेदवारांची नावे आजच जाहीर करण्याची शक्यता वर्तवली जात आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election: ''काय झाडी.. काय डोंगर... किती हे खोके?'' पुण्यात नाकाबंदीदरम्यान सापडले पाच कोटी

Karad Assembly Election 2024 : कऱ्हाडला सोनू, नकटा रावळ्यासह बुक्कीत टेंगुळवरही रंगताहेत चर्चा

Sarfaraz Khan: सर्फराज खानला पुत्ररत्न! गोड बातमी सोशल मीडियात व्हायरल

Australia दौऱ्यासाठी भारत A संघाची घोषणा, ऋतुराजच्या हाती कर्णधारपदाची धुरा, इर्श्वरनला दिली मोठी संधी

Melie Kerr: लहानपणी ज्यांच्याबरोबर वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न होतं, ज्यावर निबंध लिहिला.... जेव्हा अगदी तसंच घडतं

SCROLL FOR NEXT