maharashtra vidhansabha election DECLARED ESakal
Maharashtra Assembly Election

Maharashtra Vidhansabha Election Declared: महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका जाहीर! आचारसंहिता लागू, मतदान आणि निकालाची तारीख काय?

Vrushal Karmarkar

Maharashtra Assembly Elections Dates: महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागांसाठी निवडणुकीचे बिगूल वाजलं आहे. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली आहे. महाराष्ट्र राज्यात एकाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत. यासाठी तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुका होणार असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. यामुळे आता राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे.

राज्यातील सध्याच्या राजकीय समीकरणाबाबत बोलायचे झाले तर, यावेळी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीत पक्षफुटीमुळे दोन गट निर्माण झाले आहे. याचा या निवडणुकीवर मोठा परिणाम होणार आहे. दरम्यान या सगळ्यात आता दोन्ही युतींमध्ये जागावाटपावरून वाद आणि मतभेद होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महाराष्ट्रात गेल्या वेळी, म्हणजे 2019 मध्ये, 21 ऑक्टोबर रोजी एकाच टप्प्यात सर्व 288 जागांसाठी मतदान झाले होते. या निवडणुकीत सुमारे 61.4 टक्के मतदान झाले. यासोबतच २४ ऑक्टोबरला निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. गेल्या वेळी एकूण पात्र मतदारांची संख्या 8 कोटी 95 लाखांहून अधिक होती. मात्र, हा आकडाही वाढला आहे. 2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक भाजप आणि अविभाजित शिवसेनेने एकत्रितपणे लढवली होती.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या?

  • भाजप- 105

  • काँग्रेस-44

  • राष्ट्रवादी-54

  • शिवसेना-56

  • एसपी-2

  • AIMIM-2

  • CPIM-1

पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगानं नेमकं काय सांगितलं?

महाराष्ट्रात पोटनिवडणुका देखील होणार आहेत. महाराष्ट्रातील नांदेड लोकसभेसाठी देखील मतदान होणार आहे. वसंतराव चव्हाण यांच्या निधनाने रिक्त झालेली जागा भरण्यासाठी ही पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. सेलिब्रिटी यांनी मतदान करण्यासाठी आवाहन करावं, असं आयोगाने सांगितलं आहे. मुक्त वातावरणात निवडणुका झाल्या पाहिजे, अशा सूचना राज्याला आम्ही दिल्या आहेत. सगळ्या पक्षांना समान संधी मिळाली पाहिजे. प्रत्येक चेक पोस्टवर तपासणी केली जाईल. सामान्य नागरिकांना कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहोत. 2 किलोमीटरच्या आत मतदान केंद्र असणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajeev Kumar on Media Trends: एक्झिट पोल्सचा फेक डेटा दाखवण्याचा अट्टाहास? मुख्य निवडणूक आयुक्त मीडिया ट्रेन्ड्सवर भडकले

Election Commission : पेजरचे स्फोट होतात, मग EVM कसे हॅक होणार नाहीत... निवडणूक आयोगाने दिलं उत्तर

PAK vs ENG: सईम आयूब, कामरान घुलाम या नवख्या खेळाडूंनी पाकिस्तानला सावरले; पहिल्या दिवसाअंती केल्या २५९ धावा

Baba Siddique : म्हणून शाहरुख बाबा सिद्दिकीच्या अंत्यसंस्काराला राहिला गैरहजर ; जाणून घ्या कारण

Latest Maharashtra News Updates : निकाल त्यांच्या बाजूने जात नाही, तेव्हा ईव्हीएम खराब - शिंदे

SCROLL FOR NEXT