Jayant Patil esakal
Maharashtra Assembly Election

Jayant Patil: महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा निकष ठरला? विधानसभा निवडणुकांवर जयंत पाटलांचं मोठं वक्तव्य!

Sandip Kapde

लोकसभा निवडणुकांनंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू आहे. सर्व पक्षांचे नेते सभा आणि मेळावे घेत आहेत. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज धुळ्यात सभा घेतली. यावेळी त्यांनी जागावाटपावर भाष्य केलं.

काय असेल निकष-

"निवडून येण्याची क्षमता हाच निकष महाविकास आघाडीच्या जागा वाटपात असणार आहे," अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत व्यक्त केली. महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना, शेतकरी कामगार पक्ष तसेच दोन्ही कम्युनिस्ट पक्ष मिळून जागा वाटपाबाबत निर्णय घेतील असे जयंत पाटील यांनी सांगितले.

अजित पवारांवर निशाणा-

जयंत पाटील यांनी धुळ्यात अजित पवार यांच्यावर गुलाबी रंगावरून चांगलाच निशाणा साधला. राज्य सरकारतर्फे महिलांना गुलाबी रिक्षा वाटप करण्यात येणार आहे. "गुलाबी रिक्षा, गुलाबी जॅकेट अशा सगळ्या गुलाबी गोष्टी होत आहेत, रंगाला माझं काही ऑब्जेक्शन नाही, पण फुल पांढरे वापरलं, असं सांगत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोपरखळी मारली आहे.

भाजपवर टीका-

भाजप विविध योजनांची घोषणा करत आहे, मात्र लोकसभेत पराभव झाल्यानंतर आपला पराभव अटळ आहे असं वाटल्याने भारतीय जनता पक्षाला या गोष्टी आठवल्या आहेत, अशी टीका जयंत पाटील यांनी केली.

"बहिण भावा नंतर आता आजोबा पुतणे चुलते हे देखील लाडके होण्याची शक्यता आहे," असं म्हणत जयंत पाटील यांनी लाडका भाऊ व लाडकी बहीण योजनेवर टीका केली आहे.

"तिजोरीत काही असो की नसो, विविध योजनांची घोषणा करण्यास राज्य सरकारने ठरवलं आहे. आमचं सरकार पडलं तर या योजना बंद होतील असं सांगणं चुकीचं आहे. हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे," असे जयंत पाटील यांनी सांगितले.

अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया-

उद्या सादर होणाऱ्या अर्थसंकल्पावर जयंत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली. "देशातील महागाई कमी झाली पाहिजे, बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळाले पाहिजे, त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे," अशी अपेक्षा जयंत पाटील यांनी केंद्रीय अर्थसंकल्पातून व्यक्त केली.

"भारताची प्रगती हवी तशी होत नसल्याची खंत व्यक्त करत, देशात रोजगार निर्माण करण्याबाबत धोरण आखणे गरजेचे आहे," असे देखील स्पष्ट केले. भारतात येणारी परकीय गुंतवणूक कमी झाली आहे, परकीय गुंतवणूक कशी वाढेल त्याबाबत अर्थमंत्र्यांनी उद्या स्पष्टीकरण दिलं पाहिजे अशी अपेक्षा जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT