MVA leaders discussing seat-sharing strategies for the upcoming Maharashtra Assembly elections. Leaders of the Maha Vikas Aghadi coalition engaged in negotiations for seat-sharing ahead of the Maharashtra Assembly elections.
Maharashtra Assembly Election

Mahavikas Aghadi: महाविकास आघाडीच्या जागावाटपात अडथळे आणणारे 'ते' 5 मतदारसंघ कोणते?

MVA Seat Sharing: काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष याशिवाय अन्य पक्षांना जागा सोडण्याबाबत चर्चा सुरू आहे.

आशुतोष मसगौंडे

नवी दिल्ली, ता. १४: राज्यात महाविकास आघाडीतील पंधरा जागांवरील तिढा अद्यापही सुटलेला नसून याबाबत अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडे सोपविण्यात आले आहे. यात वांद्रे पूर्व या मतदारसंघाचाही समावेश असल्याचे कळते.

दरम्यान आजच्या बैठकीत काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील काही मुद्यांवर सखोल चर्चा करण्यात आल्याचे समजते. पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अध्यक्षतेखाली आज दिल्लीत राज्यातील काँग्रेस नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. यावेळी लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, जाहीरनामा समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाणसुद्धा उपस्थित होते.

'त्या' पाच जागा

राज्यातील पंधरा जागांवर दोन किंवा तिन्ही पक्षांनी दावा केलेला आहे. या जागांवर मुंबईतील महाविकास आघाडीच्या बैठकीत निर्णय होऊ शकला नाही. यात वांद्रे पूर्व हा महत्त्वाचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघाचे विद्यमान आमदार झिशान सिद्दीकी आहेत. परंतु ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्याने काँग्रेसने या मतदारसंघावर दावा केला आहे.

याशिवाय भिवंडी, औरंगाबाद पश्चिम, सिल्लोड, अमरावती या मतदारसंघावर एकमत होऊ शकले नाही. या जागांबाबत आज दिल्लीत झालेल्या बैठकीत चर्चा झाली.

महाविकास आघाडीतील तिन्ही प्रमुख पक्षांमध्ये जवळपास २०० जागांचे वाटप पूर्ण झाले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष याशिवाय अन्य पक्षांना जागा सोडण्याबाबत चर्चा सुरू आहे.

मतभेद असलेल्या जागा वगळून इतर जागांवर प्रचाराचे काम सुरू करण्याचे निर्देश काँग्रेसश्रेष्ठींनी राज्यातील नेत्यांना दिले आहेत. मतभेद असलेल्या जागांचा निर्णय आता काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेसचे नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे घेणार असल्याचे स्पष्ट आहे.

हरियानापासून घेतला धडा

हरियानातील निवडणुकीचा अनुभव पाहता सावध राहण्याचा सल्ला काँग्रेसश्रेष्ठींनी नेत्यांना दिला आहे. 'काँग्रेसच्या वस्तुस्थितीला धरून निर्णय घ्या, अधिक आक्रस्ताळी भूमिका घेणे टाळावे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर आज चर्चा झाली. यात मराठा व ओबीसी समाजाला न दुखावता तरतुदी कराव्यात अशी सूचना करण्यात आली आहे. इतर राज्याप्रमाणे महिलांना दरमहा २ हजार रुपये, जातीनिहाय जनगणना, युवकांना नोकऱ्या या तरतुदीसुद्धा करण्यात आल्या आहेत.

#ElectionWithSakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohammad Shami पुनरागमनाच्या सामन्यातच ठरला मॅचविनर! ७ विकेट्सह फलंदाजीतही पाडली छाप; पाहा Video

Winter Health Tips : हवामानातील बदलामुळे होणाऱ्या सर्दी-खोकल्याला वैतागला आहात, औषधांपेक्षा हे घरगुती उपाय ठरतील फायद्याचे

Healthy Food : मुलांसाठी पोषक आहेत हे लाडू, घरीच बनवा अन् नैसर्गिकरित्या मुलांची उंची वाढवा

Cherry Blossom Festival : चेरी ब्लॉसम फेस्टिव्हल पहायला जपान,चीनला कशाला जायचं? भारतात आहेत ही खास ठिकाणं

Latest Maharashtra News Updates live : नागपूरमध्ये शहा, खर्गे एकाच हॉटेलमध्ये मुक्कामी

SCROLL FOR NEXT