Manoj Jarange Patil  sakal
Maharashtra Assembly Election

Manoj Jarange: मनोज जरांगेंचा समाजाला कडक इशारा, म्हणाले- तुमचं मत जर कुणाला विकले तर...

Vrushal Karmarkar

मराठ्यांनी कुणाच्या मागे जायचं नाही. आपलेच ५०-५५ टक्के आहेत. दलित, मुस्लिम यांच्या अंगावर जायचे नाही. हा बदल आपल्याला करायला पाहिजे. आपल्या तापट बुद्धीचा यांनी फायदा उचलला आहे. मला माझ्या मराठ्यांचे भले करायचे आहे. त्यांना करायच्या आहेत दंगली. मी म्हणलो असतो तर प्रत्येक गावात मारामाऱ्या झाल्या असत्या. देवेंद्र फडणवीसांना डोकं मेंदू आहे की नाही? आपण आरक्षण मागत असताना दुसऱ्याला द्यायची गरज नव्हती. देवेंद्र फडणवीस इतका क्रूर जगात माणूस असू शकतं नाही, असं म्हणत मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणविसांवर पुन्हा टीकास्त्र सोडलं आहे. ते आज सभेत बोलत होते.

देवेंद्र फडणवीस यांनी खुन्नस काढली आहे. ज्या जाती आरक्षणात जाऊ शकत नाही. मागणी नाही. आंदोलन नाही तरीही १७ जाती आरक्षणात घातल्या. शिंदे समितीला देवेंद्र फडणवीस यांनी काम करू दिले नाही. शेतकऱ्यांनी कर्जमुक्ती मागितली. दिली नाही. शेतकऱ्यांनी हमी भाव मागितला नाही दिला. २४ तास लाईट मागितली; नाही दिली. देवेंद्र फडणवीस यांनी सगळे सोडून १५०० रुपये द्यायचे काम केले. आयुष्यासाठी आम्ही आरक्षण मागितले ते दिले नाही. शेतीमालाला भाव द्या म्हणून मागणी केली जाते दिली जात नाही, असं खंत मनोज जरांगे यांनी बोलून दाखवली आहे.

तुमचं मत जर कुणाला विकले तर तुमची जात संपेल. मराठा रस्त्याने जाताना सरळ चालला पाहिजे. मान खाली घालून जायला नाही पाहिजे. या निवडणुकीच्या आणि राजकारणाच्या नादात मराठ्यांची मान खाली जाऊ द्यायची नाही. समाजाचे पावित्र्य जपा. समाजाची उंची जपा समाज हा सागरासारखा राज्यात पसरला आहे. राज्याच्या बाहेर सुद्धा आहेत काही करून हा समाज संपवू देऊ नका. आपल्याला महाविकास आघाडीचे महायुतीचे काही देणे घेणे नाही. महाविकास आणि युती वाले सगळे हे सख्खे मावस आहेत. आपण उभे राहिले की भाजपवाले खुश होतील. उभे नाही केले तर माहाविकास आघाडी वाले खुश होतील, असं वक्तव्य मनोज जरांगेंनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Metro Fire: नुकत्याच उद्घाटन झालेल्या 'मंडई मेट्रो' स्थानकाला भीषण आग! अग्निशमनच्या पाच गाड्या घटनास्थळी; आग नियंत्रणात

T20 World Cup Final: न्यूझीलंडच्या पोरींनी जिंकला वर्ल्ड कप ! दक्षिण आफ्रिका ५ महिन्यात दुसऱ्यांदा फायनलमध्ये पराभूत

Terrorist Attack: जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, कामगारांवर गोळीबार, 3 मजुरांचा मृत्यू तर 2 जखमी

विधानसभेसाठी भाजपची यादी जाहीर, देवेंद्र फडणविसांना पुन्हा संधी, प्रतिक्रिया देत म्हणाले...

Vidhansabha Election : समाजवादी गणराज्य पक्ष काँग्रेसमध्ये विलीन! कपिल पाटलांचा खर्गेंच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT