Maharashtra Assembly Election

Sulbha Khodke: काँग्रेसकडून आमदार सुलभा खोडकेंचं निलंबन; उद्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार?

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : अमरावतीच्या काँग्रेसच्या आमदार सुलभा खोडके यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत पक्षानं त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. सहा वर्षासाठी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, त्या उद्याच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु आहे.

काँग्रेसनं पत्रकात नेमंक काय म्हटलंय?

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सहीनिशी काढलेल्या पत्रकात म्हटलं की, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आणि त्यानंतरही सुलभा खोडके यांनी सातत्यानं पक्षविरोधी काम केल्याच्या अनेक तक्रारी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयाकडं आलेल्या होत्या. त्यानुसार महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या निर्देशानुसार पुढील ६ वर्षांसाठी सुलभा खोडके यांना निलंबित करण्यात आलं आहे.

राष्ट्रवादीत प्रवेशाची चर्चा

दरम्यान, सुलभा खोडके या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळं रविवारी अर्थात उद्याच सुलभा खोडके राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. पण तत्पर्वीच काँग्रेसनं त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

क्रॉसवोटिंगमध्ये सहभाग?

काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या राज्यसभा, विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या सात आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याचं समोर आलं होतं. यामध्ये सुलभा खोडके यांचंही नाव होतं. या क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांना यंदा विधानसभेची उमेदवारी मिळणार नाही, असा निर्णय काँग्रेसनं घेतला होता. तसंच लोकसभा निवडणुकीच्यावेळी काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्या प्रचारातही त्यांचा सहभाग नव्हता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba Siddiqui: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या! दोन जण ताब्यात

G N Saibaba: दिल्ली विद्यापीठाचे माजी प्राध्यापक जीएन साईबाबा यांचे निधन, NIMS मध्ये घेतला अखेरचा श्वास

Manoj Jarange Video : राजा माझ्या पाठीशी! उपोषण सुरू असताना जरांगे छत्रपतींच्या पायाला हात का लावायचे?

अदानीचे टेंडर रद्द करणार आणि जागा पोलिसांना..! उद्धव ठाकरेंनी सांगितला सरकार आल्यानंतरचा प्लॅन

IND vs BAN, 3rd T20I: दसऱ्याच्या दिवशी टीम इंडियाची आतषबाजी! सॅमसनचं शतक, तर सूर्याची फिफ्टी अन् विक्रमी २९७ धावांचा डोंगर

SCROLL FOR NEXT