Chitra Wagh And Rupali Chakankar Esakal
Maharashtra Assembly Election

Chitra Wagh And Rupali Chakankar: चित्रा वाघ ते रुपाली चाकणकर... 'या' 12 जणांना मिळणार आमदारकी? महायुतीचा फॉर्म्युला ठरला

आशुतोष मसगौंडे

Maharashtra Political Updates in Marathi: महाविकास आघाडीचे सरकार होते तेव्हापासून रखडलेली राज्यपाल नियुक्त आमदारांची निवड विधानसभा निवडणुकीपूर्वी होण्याची शक्यता आहे. कारण महायुती सरकार लवकरच राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीची मिळून 12 नावे राज्यपालकांकडे पाठवणार आहे.

या 12 जागांमध्ये सर्वाधिक 6 जागा भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला येणार आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला प्रत्येकी 3 जागा मिळणार असल्याची बातमी साम टीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.

कोणाला मिळणार संधी?

दरम्यान महायुतीने यावेळी विधानसभा निवडणुकीत फायदा मिळवून देणाऱ्या चेहऱ्यांनाच राज्यपाल नियुक्ती आमदरकी देण्याचे ठरवले आहे.

महायुती सरकार राज्यपालांना पाठवणाऱ्या 12 नावांमध्ये भाजपकडून गेल्या अनेक वर्षांपासून संधीच्या प्रतिक्षेत असलेल्या चित्रा वाघ, विजया राहटकर, सुधाकर कोहळे, अतुल भोसले आणि बाळासाहेब सानप यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या राहुल शेवाळे यांना पुन्हा संधी देणार असल्याची चर्चा आहे. यामध्ये शेवाळे यांच्याबरोबर रवींद्र फाटक आणि मनिषा कायंदे यांनाही संधी मिळू शकते.

दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी त्यांच्या वाट्याला येणाऱ्या 3 जागांवर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, सिद्धार्थ कांबळे आणि बाबा सिद्दिकी यांना संधी मिळेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

गेल्या तीन वर्षांपासून रखडलेली राज्यपाल कोट्यातील आमदारांची नियुक्ती लवकरच होण्याची शक्यता आहे. कारण येत्या काही दिवसांतच राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर होणार आहेत. त्यामुळे आचारसंहीता लागण्यापूर्वी सत्ताधारी पक्ष राज्यपालांकडून या आमदारांच्या नियुक्त्या करून घेण्याच्या तयारीत आहेत.

आता या राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये कोणात्या पक्षातून कोणार संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. असे असले तरी सत्ताधारी ज्यांचा विधानसभा निवडणुकीत फायदा होणार त्यांनाच संधी देणार असल्याचे बोलले जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Budget 2025: मोदी 3.0च्या बजेटची तयारी सुरू; निर्मला सीतारामन करणार ऐतिहासिक विक्रम, कोणत्या मुद्द्यांवर देणार भर?

'धनगरांनी शेळ्या-मेंढ्या राखायचं बंद केलं, तर महाराष्ट्रातील जनतेला कुत्र्याचं मटण खावं लागेल' पडळकरांचं वादग्रस्त वक्तव्य

Bigg Boss Marathi 5 : अभिजीत विनर तर सूरज बाहेर ! सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या त्या स्क्रिनशॉटचं सत्य काय ? घ्या जाणून

Dharmajagran Yatra: अजितदादांमुळे शिंदे लागले कामाला, काढणार ‘मुख्यमंत्री धर्मजागरण यात्रा’

Chess Olympiad सुवर्णपदक विजेत्या भारतीय संघाचं रोहित शर्मा स्टाईल सेलिब्रेशन, 'रोबो वॉक' करत उंचावली ट्रॉफी, पाहा Video

SCROLL FOR NEXT