Raj Thackeray esakal
Maharashtra Assembly Election

MNS Candidates List: मनसेची सहावी यादी जाहीर, ३२ उमेदवारांची नावे, कुणाला मिळाली संधी?

MNS Candidates Sixth List: मनसेकडून उमेदवारांची सहावी यादी जाहीर करण्यात आली आहे. यात ३२ उमेदवारांना संधी देण्यात आली आहे.

Vrushal Karmarkar

राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष उमेदवारांच्या याद्या जाहीर करत आहेत. आज मनसेने ३२ उमेदवारांची सहावी यादी जाहीर केली आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणुकीच्या वेळापत्रकानुसार २९ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. तर ४ नोव्हेंबर ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. यामुळे आता सर्व पक्ष त्यांच्या अंतिम याद्या जाहीर करत आहेत.

२० नोव्हेंबरला विधानसभा निवडणूक होणार असून २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असताना मनसेने विधानसभा निवडणुकीसाठी आपली सहावी यादी जाहीर केली आहे. मनसेच्या पाचव्या यादीत एकूण ३२ उमेदवारांचा समावेश आहे.

मनसे उमेदवारांची यादी

मनसे उमेदवारांच्या सहाव्या यादीत एकून ३२ जणांची नावे घोषित करण्यात आली आहे. यामध्ये नागपूर पूर्वमधून अजय मारोडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नंदुरबारमधून वासूदेव गांगुर्डे, मुक्ताईनगरमधून अनिल गंगतिरे, आर्वीमधून विजय वाघमारे, सावनेरमधून घनश्याम निखाडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे मध्य मुंबईतील माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. निवडणूक लढवणारे अमित हे ठाकरे कुटुंबातील तिसरे व्यक्ती आहेत. त्यांचे वडील आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कधीही निवडणूक लढवली नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपचे 'ते' दोन नेते फडणवीसांच्या जवळचे, मात्र लढावे लागणार 'धनुष्यबाणा'वर; कारण काय?

Emerging Asia Cup: भारताला हरवणाऱ्या अफगाणिस्तानने मिळवले जेतेपद ! फायनलमध्ये श्रीलंकेवर केली मात

Congress Candidates List: काँग्रेसकडून आणखी १४ उमेदवारांच्या नावाची घोषणा, जाणून घ्या कुणाला कुठून मिळाली उमेदवारी?

IND vs NZ: राधा यादव लढली! बॉलिंगही केली, बॅटिंगही केली, पण टीम इंडिया हरली; न्यूझीलंडची मालिकेत बरोबरी

ShivSena Candidate List: दिग्गज नेत्यांची वर्णी; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, किती शिलेदार उतरले मैदानात?

SCROLL FOR NEXT